(HDFC चेयरमनच्या मुलाचे ख्रिश्चनपध्दतीने लग्न झाले.)
जोधपूर - HDFC बँकेचे चेयरमन दीपक पारेख यांचा मुलगा सिद्धार्थ आणि त्यांची प्रियकर क्लेयर ओ नेल यांनी शुक्रवारी बालसमंद पॅलेसमध्ये ख्रिश्चन धर्माच्या रितीरिवाजानुसार लग्न केले. संध्याकाळी साडे पाच वाजता, नवदाम्पत्य पाश्चात्य वेशभूषेत दिसले. दोघांना चर्चच्या फादरने बायबलची शपथ घेण्या सांगितली आणि या नवदाम्पत्याला कर्तव्ये सांगितली. या शाही गार्डनला ख्रिश्चन एथनिक थीमनुसार सजावण्यात आले होते. वेस्टर्न ड्रेसकोडमध्ये आलेल्या पाहूण्यांनी या जोडीला शुभेच्छा दिल्या. यानंतर रँपार्ट आणि शँपेन पार्टीचे आयोजन करण्यात आले.
कॉकटेल पार्टीमध्ये ड्रीक्सने झाले स्वागत
तलावाजवळ आयोजित या पार्टीत पाहूण्यांचे स्वागत ड्रिंक्सने करण्यात आले. त्यानंतर कॉकटेल डिनर झाले. या दरम्यान या दाम्पत्याने केक कापला. रात्री उशीरपर्यंत येथे डान्स पार्टी सुरू होती. या पार्टीत फँसी ड्रेसचाही तडका होता. या डिनर पार्टी आगोदर महाराणी हेमलता राजेसुध्दा पार्टीत पोहोचल्या. दीपक पारेखने पाहूण्यांचे स्वागत केले. यानंतर शनिवारी उम्मेद भवन पॅलेसमध्ये बारादरी लॉनवर हिंदू रिती रिवाजानुसार हे दाम्पत्य विवाहबंधनात बांधले जाईल.
आज अनेक बडे तारे दिसतील
आज होणार्या या विवाह सोहळ्यात देशाचे सर्वात श्रीमंत व्यक्तीमत्व मुकेश अंबानी, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासमवेत अनेक नामांकीत हस्ती हजेरी लावणार आहेत. या पार्टीसाठी बालसमंद पॅलेस आणि तलावाखालील गार्डनला मोगर्याच्या फुलांनी सजवण्यात आले आहे.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, या लग्नसोहळ्याचे इतर फोटो...