आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Marriage Party Beating Up Eachother Over The Fake Jewelleries In Tamil Nadu

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वधुच्या अंगावरील खोट्या दागिन्यांवरून तामिळनाडूत हाणामारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विरूधूनगर - वधूने सोन्याचा मुलामा चढवलेले खोटे दागिने घातल्याच्या कारणावरून तामिळनाडूत वधू-वराच्या मंडळींमध्ये हाणामारी होऊन लग्न मोडल्याची घटना घडली. वराकडील पाहुण्यांनी वधूच्या दागिन्यांवर संशय घेतला. यानंतर दोन्ही पक्ष आक्रमक झाल्याने लग्न समारंभात फ्रीस्टाइल हाणामारी झाली. त्यात वराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. बीएसएनएलमध्ये कार्यरत असलेल्या वराच्या आईला हुंडा मागितल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे.


येथील 25 वर्षीय वधू व 33 वर्षांच्या वराचे नुकतेच लग्न जमले होते. त्यात वधूला सोन्याचे 50 दागिने व 2 लाख रुपये देण्याचे ठरले. लग्नादिवशी वधू मंदिरात गेल्यानंतर वराकडील पाहुण्यांना दागिन्यांबाबत संशय आला. दोन्ही पक्षांमध्ये सुरुवातीस शाब्दिक बाचाबाची झाली व त्यानंतर दोघांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. खासगी बँकेत व्यवस्थापकपदी नोकरीस असलेल्या वराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. हुंडा मागितल्याच्या आरोपावरून वराच्या आईला अटक करण्यात आली आहे. नवरदेवावर हल्ला केल्याप्रकरणी वधूच्या पाहुणे मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.