आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्निपरीक्षा देताना पित्याचे पाय घसरले, मुलीसह विस्तवावर कोसळला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालंधर (पंजाब)- आपण 21 व्या शतकात प्रवेश केला आहे. भारतीय समाज स्वत:ला आधुनिक मानत आहे. दुसरीकडे समाजात आजही वेगवेगळ्या प्रकारच्या अंधश्रध्‍दा व सामाजिक क्रूरप्रथा सुरुच आहेत. अशीच एक अंधश्रध्‍देची घटना जालंधरमध्‍ये घडली आहे. यात एक पिता व आपल्या मुलींबरोबर अग्निपरीक्षा देत असताना विस्तवावर कोसळतो. यात त्याची पाठ व कान होरपळते.
वास्तविक, दक्षिण भारतातील प्रसिध्‍द देवी मरी अम्माची यात्रा आज संपन्न झाली. या यात्रेत बनवण्‍यात आलेले 20 फुट लांब व 3 फुट रुंद अग्निकुंडात शेकडो लोकांनी विस्तवावर चालून अग्निपरीक्षा दिली. असे करणे शुभ मानले जाते. आगीवरुन आनवाणी पायाने जाऊन साकडं मागितले जाते.
या अग्निपरीक्षेत एक पिता आपल्या मुलाला उचलून विस्तवावरुन जात असताना त्याचा पाय घसरला. या दुर्घटनेत त्याचे कान व पाठ होरपळले आहे. येथे उपस्थित असलेल्या लोकांनी काजी मंडीमध्‍ये एका घरात नेले व नंतर त्याला हॉस्पीटलमध्‍ये दाखल केले.
पुढील स्लाइड्सवर पाहा या अग्निपरीक्षेचे फोटोज...