आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'वेड्याशी लग्न झाले माझे' असे लिहून नववधूने घेतला टोकाचा निर्णय...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिने आपला विवाह वेड्याशी झाल्याचे लिहून आत्महत्या केली. - Divya Marathi
तिने आपला विवाह वेड्याशी झाल्याचे लिहून आत्महत्या केली.
भिवाडी (राजस्थान) - अलवर जिल्ह्यात एका नववधूने फासावर लटकून आपला जीव दिला. 3 महिन्यांपूर्वीच तिचा विवाह झाला होता. हे प्रकरण पती-पत्नीमध्ये झालेल्या भांडणाचे आहे असे मानले जात आहे. महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी एक पत्र लिहिले आहे. त्यामध्ये तिने आपला विवाह एका वेड्याशी झाल्याचे म्हटले आहे. 
 
 
- भिवाडी येथील कॉसमॉस सोसायटीमध्ये मोनिका आपल्या पती पंकजसोबत राहत होती. तीन महिन्यांपूर्वीच त्या दोघांचा विवाह झाला होता. 
- मोनिका पलवल येथील एका कंपनीत परचेसिंग विभागात काम करत होती. तर तिच्या पतीचे भिवाडी येथे गिफ्ट शॉप आहे. 
- ती दररोज सकाळी लवकर उठत होती. पंकज शनिवारी शॉपवर गेला तेव्हा ती घरात एकटीच होती. सकाळी घराबाहेर आली नसल्याने शेजारच्या मंडळींना तिला आवाज दिले. ती बाहेरच येत नसल्याचे पाहता शेजऱ्यांना संशय आला. 
- त्यांनी मोनिकाच्या कुटुंबियांना बोलावले. आवाज दिल्यानंतरही घरातून कुणीच आले नाही. दार आतून बंद नव्हता. ते आत मोनिकाच्या खोलीत गेले. आतील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. 
- मोनिकाचा मृतदेह पंख्याला लटकला होता. तसेच रुममधील एसी आणि लाइट सगळेच ऑन होते. 
- आपल्या मुलीला फासाच्या फंद्यावर लटकतानाचे पाहून कुटुंब धायमोकलून रडत होता. शेजाऱ्यांनीच पोलिसांना याबाबतची माहिती दिली. घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. तसेच शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. 
 

पती-पत्नीत नेहमीच भांडणे
पोलिसांनी आस-पासच्या लोकांकडून माहिती घेतली. त्यानुसार, मोनिका आणि पंकजमध्ये दररोज भांडण होत असे. त्यांच्या लग्नाला 3 महिनेच झाले होते. तरीही ते दररोज भांडत होते. काहींनी सांगितल्याप्रमाणे, दोघांनी एकमेकांना बोलणे सुद्धा बंद केले होते. 

पुढील स्लाइड्सवर पाहा फोटोज...
बातम्या आणखी आहेत...