आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीचे होते अफेअर, दीराची वाईट नजर; अशा अवस्थेत मिळाला महिलेचा मृतदेह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनीताच्या गळ्यावर फासाचे व्रण स्पष्ट दिसत होते. - Divya Marathi
अनीताच्या गळ्यावर फासाचे व्रण स्पष्ट दिसत होते.
इंदूर / मंदसौर - मंदसौर जिल्ह्यातील मल्हारगड येथे एका महिलेच्या मृत्यूनंतर तिचा पती आणि दीराबद्दल खळबळजनक खुलासे झाले आहेत. मृत महिलेच्या भावाने आरोप केला आहे की तिच्या दीराची तिच्यावर वाईट नजर होती तर, पतीचे बाहेर अफेअर होते. यामुळे पती-पत्नीमध्ये नेहमी भांडणे होत होती. यातूनच तिची हत्या झाली आहे. महिलेच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनंतर पती आणि सासरच्या लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

अस्ता-व्यस्त कपड्यांमध्ये आढळला होता मृतदेह, गळ्यावर फासाचे निशाण
> मल्हारगड येथील अनिता राकेश भारती या महिलेचा शनिवारी संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला होता.
> महिलेचे घर मल्हारगड पोलिस स्टेशनच्या नजीकच आहे. तिच्या भावाने - विकास गिरी यांनी सांगितले की ताईने रात्री फोन करुन सांगितले होते की हे लोक खूप मारहाण करत आहेत. मी तिला सकाळी घरी येतो असे सांगितले होते.
> सकाळी 6 वाजता एका नातेवाईकाचा मला फोन आला, त्याने सांगितले की अनिताचा मृत्यू झाला आहे. मी तिथे पोहोचलो तर तिचा मृतदेह झाकून ठेवण्यात आला होता.
> तिच्या चेहऱ्यावरील चादर काढून पाहिले तेव्हा गळ्यावर दोरीचे व्रण होते, नाकातून रक्त वाहात होते आणि अंगावरील कपडे अस्ताव्यस्त झालेले होते.
> तिथे उपस्थित लोक मला सांगू लागले की शॉक लागल्याने तिचा मृत्यू झाला.
> त्यावर मी विचारले शॉक लागला तर गळ्यावर फासाचे व्रण कसे काय ? यावर सर्वच जण चूप झाले. मी लगेच माझ्या घरून सर्वांना बोलावून घेतले.

पतीचे होते अफेअर, दीराची वाईट नजर
> अनिताचे 2011 मध्ये लग्न झाले होते, तिला एक मुलगी आहे. तिच्या भावाने पोलिसांना सांगितले की भाऊजीचे एका महिलेसोबत अफेअर होते. त्यावरुन दोघांमध्ये नेहमी भांडण होत होते. ताईच्या दीराचीही तिच्यावर वाईट नजर असायची.
> मृतदेह पाहून स्पष्ट होत आहे की शॉक लागून तिचा मृत्यू झाला नाही तर सासरच्या लोकांनी गळा अवळून तिचा खून केला आहे.
> अनिताच्या माहरेच्या मंडळींनी तिचा पती, दीर आणि सासरच्या इतर लोकांना अटकेची मागणी करत चक्काजाम आंदोलन केले. त्यांनी मृतदेह पीएमसाठी नेण्यासही विरोध केला होता.
> पोलिस आणि काही ज्येष्ट मंडळींनी समजावल्यानंतर मृतदेह पीएमसाठी पाठवण्यात आला.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, अटकेच्या मागणीसाठी शेकडो लोक रस्त्यावर..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...