आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रियकरासोबत पळून जात होती बायको, नवऱ्याने दुचाकीवरून पाठलाग करून पकडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरिया- लग्नाच्या दोन वर्षानंतर प्रियकरासोबत पळून जात असलेल्या बायकोला तिच्या नवऱ्याने दुचाकीवरून पाठलाग करून एका बस स्टँडवर पकडले. बसमधून बायको प्रियकरासोबत पळून जात बोती. नवऱ्याने दोघांना खाली उतरवले आणि मारहाण करण्यास सुरूवात केली. बसस्टँडवर गोंधळ सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून महिला आणि प्रियकराला ताब्यात घेतले.


असे आहे संपूर्ण प्रकरण...
- कोरिया जिल्ह्यातील कोटिया-खडगवा येथील रहिवाशी युवकाचे दोन वर्षांपूर्वी पेंड्री येथील तरूणीशी लग्न झाले होते. लग्नाच्या एका वर्षानंतर नवविवाहितेचे गावातील नात्यात असलेल्या एका तरूणावर प्रेम जडले.
- याविषयी पतिला कळाले होते. त्यामुळे  तो आपल्या पत्नीवर नजर ठेवत होता. सोमवारी महिला घरातून निघून प्रियकरासोबत पळून जात होती.
- ते चिरमिरी बस स्टँडवरून बिलासपूर येथे जाणाऱ्या एका बसमध्ये बसले होते. पत्नी पळून गेल्याचे कळताच पतिने माहिती काढली, तेव्हा त्याला बिलासपूर बसमध्ये दोघे असल्याचे कळाले.
- पतिने आपल्या दुचाकीवरू त्यांचा पाठलाग करण्यास सूरूवात केली. कोरबी बस स्टँड येथे येथे बस थांबली तेव्हा पठलाग करत असलेल्या पतिने दोघांना खाली उतरवले आणि तेथेच मारहाण करण्यास सुरूवात केली.
- बसमध्ये गोंधळ पाहून लोकांनी पोलिसांना माहिती  दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि महिला आणि तिच्या प्रियकराला पोलिस ठाण्यात घेऊन गेले. तेथे पोलिसांनी तिची समजूत घालून नातेवाईकांच्या ताब्यात दिले.


वडिल म्हणाले समाजासमोर होईल याचा निर्णय...
- प्रियकरासोबत पळून जाताना पकडलेल्या महिलेच्या वडिलांनी सांगितले की, त्याच्या मुलीच्या अशा पळून जाण्यामुळे समाजाच्या मान-मर्यादांना ठेच पोहोचली आहे. पळून जाणारा युवक नात्यातील आहे. यामुळे हे प्रकरण समाजासमोर ठेवण्यात येईल. युवकाकडून समाजिक दंड वसूल करण्यात येईल तसेच तो महिलेसोबत राहू इच्छीत असेल, तर त्याला लग्नात झालेला 2 लाखांचा खर्चाची भरापाई करावी लागेल.


पोलिस काहीच करू शकले नाही...
- पोलिस चौकीत चौकशीनंतर महिलेची समजूत काढताना तिने पतिच्या घरी जाण्यास साफ नकार दिला. तसेच, प्रियकरासोबत पूढील आयुष्य काढेल असे तिने सांगितले. महिला सज्ञान असल्याने तिची समजूत काढून परत पाठवण्याशिवाय पोलिस काहीच करू शकले नाही. महिलेचा तोरा पाहून पतिनेही तिच्यासोबत राहण्यास नकार दिला.


पुढील स्लाइडवर पाहा, बातमीशी संबंधित आणखी फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...