आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mars Mission Of India Is Mere Stunt Claims Madhavan Nair

भारताची मंगळ मोहीम निव्वळ स्टंटबाजी, जी. माधवन नायर यांचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने आगामी स्वदेशी मंगळ मोहिमेतून महत्त्वपूर्ण संशोधन होण्याबाबत केलेले भाकीत तसेच त्यावरील 450 कोटी रुपये प्रस्तावित खर्चाचा दावा हा प्रसिद्धीचा निव्वळ हातखंडा आहे, असा खळबळजनक आरोप भारतीय ‘मून मॅन’ इस्रोचे निवृत्त प्रमुख आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ जी. माधवन नायर यांनी केला आहे.

देशातील संदेशवहन क्षेत्र तोकडे आहे. के. कस्तुरीरंगन समितीने सुचवलेल्या शिफारशीनुसार संदेशवहनातील त्रुटी पूर्ण होणे आवश्यक आहे. अशा स्थितीत यानाचे प्रक्षेपण झाल्यास त्याचे स्वरूप पीएसएलव्हीप्रमाणेच असेल. मंगळ मोहिमेच्या भवितव्याबाबत किमान आठ महिने वाट पाहायला हवी, असे नायर म्हणाले.


जीएसएलव्हीमध्ये तांत्रिक अडचण
नायर यांच्या इस्रो अध्यक्षपदाच्या सहा वर्षांच्या कारकीर्दीत 25 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. यामध्ये चांद्रयान - 1 मोहिमेचा समावेश आहे. 1800 किलो वजनाचा उपग्रह वाहून नेण्याची जीएसएलव्हीची क्षमता आहे. या माध्यमातून यान मंगळ ग्रहाच्या कक्षेपर्यंत पोहोचवणे शक्य होणार आहे.
निराकरण आवश्यक
जीएसएलव्हीमधील अनेक तांत्रिक बाबींचे निराकरण होणे आवश्यक आहे. अशा स्थितीत ‘मार्स ऑरिबटर मिशन’चे भवितव्य काय, असा सवाल नायर यांनी केला आहे. इस्रोचे अध्यक्ष के. राधाकृष्णन यांनी मंगळ मोहिमेतून महत्त्वपूर्ण संशोधन होईल, असा विश्वास व्यक्त केला होता.