आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मार्स ऑर्बिटर\'ची झेप, पहिला टप्‍पा यशस्‍वी; पृथ्‍वीच्‍या कक्षेत यान दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई- ज्या क्षणाची अवघ्या देशाला प्रतिक्षा होती तो क्षण आज (मंगळवार) साकार होण्यासाठी सज्ज झाला आहे. देशाची आत्तापर्यंतची सर्वाधिक महत्वकांक्षी मंगळ मोहीम सुरू झाली आहे. श्रीहरी कोटाच्या सतीष धवन अंतराळ केंद्राहून मंगळ यानाचे दुपारी 2 वाजून 38 मिनिटांनी प्रक्षेपण झाले आहे. प्रक्षेपणानंतर प्रक्षेपक यान चाळीस मिनिटात पृथ्वीच्या कक्षेत पोहोचेल. हे यान 20 ते 25 दिवस पृथ्वीच्या कक्षेत फिरत राहील. त्यानंतर 1 डिसेंबरला 40 कोटी किलोमिटर लांब असलेल्या मंगळ ग्रहाकडे ते झेप घेईल. मंगलयान सप्‍टेंबर 2014मध्‍ये मंगळाच्‍या कक्षेत दाखल होईल.

मंगलयानाचे यशस्‍वी प्रक्षेपण झाल्‍यानंतर भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्‍या शास्‍त्रज्ञांचे अभिनंदन केले. प्रक्षेपण झाल्‍यानंतर 44 मिनिटांनी मार्स ऑर्बिटर यान पृथ्‍वीच्‍या कक्षेत यशस्‍वीरित्‍या दाखल झाल्‍याची माहिती इस्रोचे प्रमुख के. राधाकृष्‍णन यांनी दिली.