आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपूर्व योग- मंगळ ग्रह 79 वर्षांनंतर सर्वांत जास्त चमकणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- खगोलप्रेमींना लवकरच अवकाशात अद्भुत दृश्य अनुभवायला मिळणार आहे. लाल रंगाचा मंगळ ग्रह 70 वर्षांनंतर आपल्या पूर्ण आभेसह प्रकाशणार आहे. मंगळ 25-26 ऑगस्टला पृथ्वीच्या अगदी जवळ येणार आहे. शनीची सरळ दृष्टी मंगळावर पडणार असल्याने तो सर्वांत जास्त चमकताना दिसेल.

तसा तर मंगळ दर 26 वर्षांनंतर पृथ्वीच्या जवळ येतो. या वर्षी तसा योग जुळून आला आहे. यावर्षी 30 वर्षांनंतर शनीची मंगळाशी होणारी युती काही विशेष संयोग घेऊन येणार आहे. सध्या कन्या राशीतील स्पाइका हा चमकणारा ताराही मंगळाच्या आसपासच आहे. मंगळ पृथ्वीच्या सर्वांत जवळ आहे, त्यामुळे स्पाइका ताराही मंगळाजवळ राहील. त्याचवेळी शनीही जवळपास 29 अंश अंतरावर राहील. शनीची निळी आभा आणि मंगळाची लाल आभा सूर्यास्तानंतर आकाशात अद्भुत रंगांची उधळण करतील. राजस्थान ज्योतिष परिषदेचे सरचिटणीस प्रा. विनोद शास्त्री यांच्या मते, 79 वर्षांनंतर मंगळ सर्वात जास्त चमकताना दिसेल. सर्वांत अद्भुत दृश्य 25 आणि 26 ऑगस्टला अनुभवायला मिळेल. हे दोन्ही ग्रह एकाच सरळ रेषेत परस्परांसोबत असतील. मंगळ आणि शनीची युती तूळ राशीत 3 मे 1984 मध्ये झाली होती. ही युती 3 ऑगस्ट 1984 पर्यंत कायम होती. यापुढे असा संयोग 30 वर्षांनंतर म्हणजे ऑक्टोबर 2042 मध्ये होईल.
अशा प्रकारे चमकेल मंगळ ग्रह
मंगळ + 0.5 मॅग्निट्यूडने चमकणार
मंगळ 2015 पर्यंत + 0.5, +0.6 आणि +0.4 मॅग्निट्यूडने चमकणार
मंगळ 12 डिसेंबरला पृथ्वीपासून सर्वांत दूर म्हणजे 206.6 दशलक्ष किमी दूर राहील.

कशामुळे असे घडते
पृथ्वी आणि मंगळ हे दोन्ही ग्रह सूर्याभोवती फिरतात. जेव्हा मंगळ आणि पृथ्वी या दोघांचेही परिभ्रमण वृत्त जवळ येते त्यावेळी हे दोन्ही ग्रह सर्वांत जास्त जवळ येतात. ही घटना 79 वर्षांनंतर एकदा घडते. अलीकडेच नासाने तसेच भारतीय वैज्ञानिकांनीही हीच बाब लक्षात घेऊन मंगळावर यान पाठवले आहे.

असा राहील प्रभाव
ज्योतिषाचार्य पंडित शक्तीमोहन र्शीमाळी आणि पंडित पुरुषोत्तम गौड यांच्या मते, मंगळ-शनीची युतीचा राजकारणावर विशेष परिणाम होतो. त्यामुळे जनतेत जागरूकता येईल. तसेच वादळ, नैसर्गिक संकट, विक्रमी तापमान आणि विक्रमी पावसाची शक्यता असते. तूळ, कन्या आणि वृश्चिक राशी असणार्‍यांसाठी कष्टदायक राहील. इतर राशींसाठी उत्तम राहील.