आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुमनामी बाबांच्या पेटीत नेताजी कुटुंबीयांचे फोटो, गोल फ्रेमचे चष्मेही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फैजाबाद - उत्तर प्रदेशमधील फैजाबादच्या जिल्हा कोशागारात ठेवलेल्या गुमनामी बाबा ऊर्फ भगवानजी यांच्या पेटीतील सामानांची गुरुवारी यादी बनली. पेटीतील ९६८ सामानांची यादी झाली असून उर्वरित सामानांची चौकशी सुरू आहे. यादीत गोल फ्रेमचे चार चष्मे, पेपर कटिंग आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबीयांचे छायाचित्रही आहेत. गुमनामी बाबा हेच नेताजी असल्याचा दावा अनेकदा झाला आहे.

या सर्व वस्तू नेताजींच्या मृत्यूचे रहस्य उघडकीस आणण्यासाठी नेमलेल्या न्या. एम. के. मुखर्जी आयोगासमोर सादर करण्यात आल्या होत्या. पेटीतील वस्तू अयोध्येतील आंतरराष्ट्रीय रामकथा संग्रहालयात ठेवल्या जातील.

त्यांच्या पेटीत रोलेक्स आणि ओमेगा घड्याळी तसेच आकर्षक क्रोनोमीटरही सापडले आहेत. पेटीत बांगला भाषेतील अनेक पत्रेही असून वर्तमानपत्रांच्या कटिंगसुद्धा आढळल्या आहेत. पत्रांमध्ये आझाद हिंद सेनेचे पवित्र मोहन राय, संतोष, दुलाल, विजय आणि बाबू सुकृत यांचाही उल्लेख आढळतो. बस्ती जिल्ह्यातील एका गावात गुमनामी बाबांचे वास्तव्य होते.
बातम्या आणखी आहेत...