आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Martyr Bhagat Singh`s Ancestral Village Wears Modern Look

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहीद भगतसिंग यांच्या गावाला आधुनिक ‘लूक’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड - शहीद भगतसिंग यांच्या पंजाबमधील मूळ गावाचे रुपडे बदलले आहे. नवान शार जिल्ह्यातील खातकर कलान गाव सिमेंट रस्ते, पथदिवे आणि उद्यानाने फुलले आहे. सरकारच्या मदतीमुळे गावाने विकास साध्य केला आहे.

गावात आधुनिक गृहसंकुल उभारले जात आहेत. त्याचप्रमाणे येथे अत्यावश्यक सुविधा उपलब्ध होत आहेत, असे सरपंच सुखविंदर सिंग यांनी सांगितले. खातकर कलान चंदिगड-पठाणकोट महामार्गावर चंदिगडपासून 100 कि.मी. अंतरावर आहे. ग्रामीण भागात आढळणारे धुळीने माखलेले रस्ते येथे दिसत नाहीत. गावातील निम्म्यावर लोक परदेशात आहेत. त्यांच्या बंगल्यांतून गावाच्या समृद्धीची साक्ष पटते. या गावाची लोकसंख्या तीन हजार आहे.

भगतसिंगांच्या वडिलोपार्जित घराशेजारी आलिशान बंगला बांधला आहे. एका घराची देखभाल करणारे वयोवद्ध चौकीदार हरदीप सिंग सात वर्षांपासून बंगल्याची देखभाल करत आहेत. मालक सहा वर्षात एकदाच आले होते, असे त्यांनी सांगितले.