आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: शत्रूने त्यांचे शिर कापले तरी देशासाठी ते सरताजच... शहिदांच्या कुटुंबीयांचा संताप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शवपेटीवर \'हेड\' असे लिहिले होते. मात्र, त्यांचे शिर शत्रूनेस कापले होते. - Divya Marathi
शवपेटीवर \'हेड\' असे लिहिले होते. मात्र, त्यांचे शिर शत्रूनेस कापले होते.
अमृतसर - नायब सुभेदार परमजित सिंग यांचे पार्थिव मंगळवारी लष्कराच्या हेलिकॉप्टरने त्यांच्या मूळ गावी तरनतारनमध्ये पोहोचले.  त्यांच्यावर लष्करी इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. परमजित यांना निरोप देण्यासाठी गाव लोटले. 

 तत्पूर्वी, पतीचे संपूर्ण पार्थिव मिळाले नाही मिळाले तर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणार नाही, असे परमजित यांच्या पत्नीने म्हटले होते.त्या म्हणाल्या की, भारत सरकारने याचे सडेतोड उत्तर दिले पाहिजे. पाकिस्तानी सैनिकांचे शीरदेखील कापून आणावे, तेव्हाच त्यांना आमच्या वेदना समजू शकतील! परमजितच्या कुटुंबाने पार्थिव दाखवण्याची मागणीही केली होती. ते अमर झाले, असी भावना परमजित यांचे बंधू रणजित सिंह यांनी व्यक्त केली. त्यांच्या बलिदानाचा आम्हाला अभिमान आहे. परमजित १० मे रोजी सुट्यांमध्ये येणार होते. पण त्यांच्या बलिदानाचीच बातमी आली.

देशासाठी बलिदान ही सन्मानाचीच गोष्ट आहे, असे त्यांचे वडील उधम सिंग यांनी म्हटले. परमजितचे पार्थिव जेव्हा तरनतारन येथे पोहोचले. तेव्हा तेथे शेकडो लोक त्यांना अंतिम सलामी देण्यासाठी उपस्थित होते. मुलांनीही त्यांना सलामी दिली. परमजित सिंग यांना दोन जुळी मुले व एक मुलगी आहे. 
 
बलिदानावर कुटुंबीय आणि संपूर्ण गावाला अभिमान
शहीद परमजित सिंग यांच्या मुलांचा जिथे रडूनरडून वाईट हाल होत होते तिथे ते वारंवार म्हणत होते की, त्यांचे वडील देशासाठी शत्रूशी लढताना सामना करताना हुतात्मा झाले. ज्याचा त्यांना नेहमीच अभिमान राहील. हुतात्मा परमजित यांची मुलगी सिमरदीप कौर (वय १५), जुळी मुले खुशदीप कौर आणि साहिलदीप सिंह (वय १२) यांनी म्हटले की, नि:संशय त्यांचे वडील पुन्हा कधीही परत येणार नाहीत, पण ते त्यांच्या बलिदानास कायम स्मरणात ठेवतील.  
 
शत्रुचे क्राैर्य पाहूनही सरकार धडाच घेत नाही  
शहीद परमजित यांचे भाऊ रणजित यांनी म्हटले आहे की, हे काही पहिल्यांदाच होत नाहीये. तथापि, आम्हा सैनिकांसह शत्रू सैन्याने क्राैर्य व्यवहार केला आहे. तरीही आमच्या सरकारने कुठलाही धडा घेतला नाहीये. जर गेल्या वेळच्या घटनेनंतर त्यांना सडेतोड उत्तर दिले गेले असते, तर पाकिस्तानची एवढी हिंमत वाढलीच नसती. सैनिकांसह असा व्यवहार केल्याचा बदला घेणे ही सरकारची जबाबदारी आहे.    
 
 ‘बलिदानाचा बदला घेण्यासाठी मुलाला लष्करात पाठवणार ’ 
शहीद परमजित यांची पत्नी परमजित कौर यांनी म्हटले की, त्यांना दु:खासह अभिमानही आहे की, त्यांचे वडील देशासाठी शत्रूशी लढताना हुतात्मा झाले. पण त्या पतीच्या जाण्याचे दु:खही कधी विसरू शकत नाहीत आणि त्या त्यांच्या शत्रूचा बदला घेण्यासाठी आपला मुलगा साहिलदीप सिंह याला लष्करात भरती करणार जेणेकरून मुलगा आपल्या वडिलाच्या बलिदानाचा बदला घेऊ शकेल.  
 
पुढील स्लाइडवर पाहा VIDEO आणि वाचा पुत्रपरमजितसिंग यांचे पुत्र काय म्हाणाले...
 
हेही वाचा...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...