आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहीदाचा मुलगा म्हणाला- 'पापाला जाळू नका, वेदना होतील', नक्षलींच्या चकमकीत गेला जीव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जैसलमेर (राजस्थान) - आसामच्या तिनसुखिया येथे शनिवारी नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 15 कमाउं रेजिमेंटचे तीन जवान शहीद झाले होते. यात भारतीय लष्करातील नरपतसिंह राठोड यांचाही समावेश होता. सोमवारी जैसलमेर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नरपतसिंह यांचा मुलगा फुलसिंह याला जेव्हा मुखाग्नी देण्यास सांगण्यात आले तेव्हा तो म्हणाला- 'पापाला जाळू नका, त्यांना वेदना होतील.' यावेळी वातावरण भावूक झाले होते.

फेब्रुवारीमध्ये निवृत्त होणार होते...
- शहीद नरपतसिंह यांची निवृत्ती जवळ आली होती. दोन महिन्यांपूर्वी ते सुटीवर आले होते.
- तेव्हा त्यांनी पत्नी भंवर कवंर यांना म्हटले होते, फेब्रुवारीमध्ये लष्करातून निवृत्त झाल्यानंतर गाव आणि समाजासाठी काही वेगळे करण्याचा विचार आहे. आतापर्यंत देशासाठी जगलो आता, गाव आणि कुटुंबाला वेळ देणार.
- निवृत्तीनंतरच्या आयुष्याची प्लॅनिंग करुन गेलेल्या नरपतसिंह यांच्या वीरमरणाची बातमी शनिवारी घरी कळाली, तेव्हापासून गावावर शोककळा पसरली.
- आसाममधील दिग्बोई येथील पेनगरी भागात 19 नोव्हेंबर रोजी नक्षलवादी आणि बोडो अतिरेकी असल्याची माहिती मिळाली होती. त्यांच्या विरोधातील कारवाईसाठी गेलेल्या तुकडीत नरपतसिंह होते. यावेळी झालेल्या चकमकीत ते शहीद झाले.
मुलगा म्हणाला- आज पापा घरी येणार आहेत का ?
- रविवारी रात्री शहीद नरपतसिंह यांचे पार्थिव त्यांच्या जैसलमेर येथील घरी आणण्यात आले.
- घरी जमा झालेली गर्दी पाहून त्यांचा मुलगा फुलसिंह काकांना म्हणाला, 'आज माझे वडील येणार आहे का ?'
शहीदाचे अख्खे कुटुंब देशसेवेत
- शहीद नरपतसिंह यांचे वडील सवाईसिंह आणि काका तनेसिंह लष्करी सेवेतून निवृत्त झाले आहेत. तर दुसरे एक काका दलपतसिंह हे 10 गार्ड भारतीय लष्कराच्या सेवेत होते.
- शहीदाला चार मुले. नरपतसिंह यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, थांबत नव्हते मुलांच्या डोळ्यातील अश्रू...
बातम्या आणखी आहेत...