आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षलवाद्यांच्‍या हल्‍ल्‍यातील शहिदांच्‍या पार्थिवांचा अपमान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची- झारखंडमध्‍ये नक्षलवाद्यांच्‍या हल्‍ल्यात पोलिस अधीक्षक अमरजीत बलिहार यांच्‍यासह 5 पोलिस शहीद झाले. या घटनेनंतर शोक व्‍यक्त करण्‍यात येत आहे. परंतु, शहिदांच्‍या पार्थिवांचा अपमान झाल्‍याचे निदर्शनास आले आहे.

घटनेनंतर शहिदांचे पार्थिव वाईट पद्धतीने ओढत वाहनांपर्यंत आपणण्‍यात आले. शहिदांना मिळाला पाहिजे, तसा सन्‍मान देण्‍यात आला नाही. अमरजीत शहीद झाल्‍याची माहिती मिळाल्‍यानंतर मुख्‍यालयातील एकही पोलिस अधिकारी रांची येथे त्‍यांच्‍या निवासस्‍थानी कुटुंबियांचे सांत्वन करण्‍यासाठी पोहोचला नाही. सायंकाळी एसपी (दक्षता) राजकुमार लकडा, एसपी (वायरलेस) चंद्रशेखर प्रसाद, डीआयजी शीतल उराव, एसएसपी साकेत कुमार सिंह हे अधिकारी अमरजीत यांच्‍या निवासस्‍थानी पोहोचले.

नक्षलवाद्यांच्‍या हल्‍ल्‍यानंतर माओवादी विचारवंत वारवरा राव यांनी सांगितले, की क्रांतीच्‍या मार्गामध्‍ये अशी कारवाई योग्‍य आहे.

या हल्‍ल्यामागे माओवादी झोनल कमांडर प्रवीर दा उर्फ हिरेंद्र याच्‍या पथकाचा हात असल्‍याचे बोलले जात आहे. पश्चिम बंगालमधूनही आलेले काही माओवादी हल्‍ल्यात सहभागी झाले होते. परंतु, अद्याप कोणत्‍या गटाने हल्‍ल्‍याची जबाबदारी स्विकारलेली नाही.

दरम्‍यान, हल्‍ल्‍यासंदर्भात अमरजीत बलिहार याच्‍या खासगी चालकावर संशय व्‍यक्त करण्‍यात येत आहे. अमरजीत खासगी स्‍कॉर्पिओमध्‍ये होते. चालकही खासगी होती. त्‍याच्‍या मोबाईलचा कॉल तपशिल तपासल्‍यास अधिक माहिती मिळू शकते, असे एका पोलिस अधिका-याने सांगितले.