आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मसरत तुरुंगामध्येच बंदिस्त राहणार, जनसुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - काश्मीर खो-यात मोर्चादरम्यान पाकिस्तानचा ध्वज फडकावल्याचा आरोप असलेला कुख्यात फुटीरवादी नेता मसरत आलम याच्यावर जनसुरक्षा कायद्यानुसार कारवाई करण्यात अाली असून त्याला जम्मू येथील एका तुरुंगात हलवण्यात आले आहे. या कायद्यानुसार आरोपीला जास्तीत जास्त सहा महिन्यांपर्यंत तुरुंगात ठेवता येऊ शकते. त्यामुळे सुनावणी पूर्ण होईपर्यंत किमान दोन-तीन वर्षे त्याची सुटका होऊ शकणार नाही, अशी शक्यता आहे.

विशेष म्हणजे मसरत आलम यापूर्वी चार वर्षांपासून जनसुरक्षा कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यानुसार तुरुंगात बंदिस्त होता. मात्र, पीपल्स डमोक्रॅटिक पक्षाचे राज्यात सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी त्याच्या सुटकेचे आदेश दिले होते. हुरियत नेता सय्यद अली शाह गिलानी यांच्या स्वागतासाठी आलमने मोर्चाचे आयोजन केले होते.

आलमने यापूर्वी २०१० मध्येही लोकांना भडकावून आंदोलन पेटवले होते. या वेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अनेक लोकांना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. काश्मीरध्ये घेण्यात आले होते. मात्र अलीकडेच आलमची जामिनावर सुटका करण्यात आली होती. मात्र सुटकेनंतर अल्पावधीतच त्याने पुन्हा कारवाया सुरू केल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, आलमच्या कृत्याबद्दल देशभर निदर्शने करून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. राज्यातील शांततेला त्याच्यापासून धोका आहे. सुटकेला विरोध झाला होता.