आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणजी सामना: गुजरातविरूध्‍द होणा-या सामन्यासाठी मुंबईचा संघ जाहीर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - येत्या 30 डिसेंबरपासून वलसाड येथे सुरू होणा-या ‘अ’ गट रणजी साखळीतील अखेरच्या गुजरातविरुद्ध सामन्यासाठी मुंबईने आपला संघ जाहीर केला आहे. बाद फेरीच्या प्रवेशासाठी महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात मुंबईने कर्नाटकविरुद्ध सामना गमावणा-या संघात एक बदल केला आहे. या बदलाचा मुंबईला गुजरातविरुद्ध सामन्यात फायदा होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

मनीष रावला या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली. त्याच्या जागी फिरकी गोलंदाज इक्बाल अब्दुल्ला याचा समावेश करण्यात आला आहे. मुंबई संघ सध्या 23 गुणांसह तिसºया स्थानावर आहे. जाहीर झालेला मुंबई संघ असा : वसीम जाफर (कर्णधार), आदित्य तारे, हिकेश शहा, कौस्तुभ पवार, सूर्यकुमार यादव, बलविंदर संधू (ज्युनियर), विशाल दाभोलकर, सिद्धेश लाड, जावेद खान, शार्दूल ठाकूर, इक्बाल अब्दुल्ला, प्रवीण तांबे, सागर केरकर, सौरभ नेत्रावळकर, दोराईस्वामी.