आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्या घरात टॉयलेट नाही, त्याठिकाणी निकाह पढायला जाऊ नका : मौलाना मदनी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मौलाना महमूद मदनी म्हणाले, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या मौलवी आणि मुफ्तींनी हा निर्णय घेतला आहे. - Divya Marathi
मौलाना महमूद मदनी म्हणाले, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या मौलवी आणि मुफ्तींनी हा निर्णय घेतला आहे.
गुवाहाटी - जमियत उलामा-ए-हिंद चे सेक्रेटरी जनरल मौलाना महमूद मदनी यांनी ज्या घरात टॉयलेट नसले त्याठिकाणी मौलवी आणि मुफ्तींनी निकाह पढायला जाऊ नये असे म्हटले आहे. हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या मौलविंनी हा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले. 

लवकरच संपूर्ण देशात लागू होणार निर्णय 
- न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार मौलाना मदनी म्हणाले, हरियाणा, हिमाचल आणि पंजाबमध्ये मुस्लीम विवाहासाठी टॉयलेटची अट अनिवार्य करण्यात येणार आहे. 
- ही अट लवकरच सर्वच राज्यांमध्ये लागू करण्यात येणार आहे. 
- राज्यसभेचे माजी खासदाप राहिलेल्या मदनी यांनी खानापारा मध्ये गेल्या आठवड्यात आसाम कॉन्फरन्स ऋफ सॅनिटेशन (ASCOSAN) 2017 च्या उद्घाटनावेळी ही घोषणा केली. 
 
सर्व धर्माच्या नेत्यांनी हा निर्णय घ्यावा 
- मदनी म्हणाले, मला वाटते की देशातील सर्व धर्माच्या नेत्यांनी हा निर्णय घ्यायला हवा की, टॉयलेट नसेल अशा घरात धार्मिक विधी करायचे नाही. 
- मदनी यांनी स्वच्छतचे महत्त्व सांगताना लोकांनी टॉयलेटचा वापर करण्याचे आवाहन केले. 
- ते म्हणाले स्वच्छता 2 प्रकारची असते एक अंतर्गत स्वच्छता आणि बाह्य स्वच्छता. जर आपले शरीर स्वच्छ असेल तरच आपण स्वच्छता ठेवण्यात यशस्वी होऊ. 

स्वच्छतेला बनवा जीवनाचे लक्ष्य - मुख्यमंत्री 
- कॉन्फरन्समध्ये आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनीही सॅनिटेशन आणि हायजीनचे महत्त्व पटवून दिले. 
- सर्वानंद यांनी राज्यातील लोकांना स्वच्छतेलाच जीवनाचे लक्ष्य बनवा असा सल्ला दिला. 
- ASCOSAN-2017 दरम्यान लोकांनीही स्वच्छ आसामचे उद्दीष्ट पूर्ण करण्याचा निश्चय केला. 
- सॅनिटेशन कॉन्फरन्समध्ये यावर्षी आसामला हागणदारीमुक्त करण्याची शपथही घेण्यात आली. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...