आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींनी अघोषित ‘आर्थिक आणीबाणी ’ लादली : मायावती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - मोदी सरकारने अघोषित ‘आर्थिक आणीबाणी ’ लागू केली आहे. केंद्र सरकार अनेक आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत त्याचा परिणाम होऊ नये. राज्यातील जनतेचे लक्ष इतरत्र वळवण्यासाठी नोटा बंद करण्यात आल्याची टीका बसपा प्रमुख मायावती यांनी केली आहे.

उत्तर प्रदेशातील निवडणूक तोंडावर येताच मोदींना काळ्या पैशांची समस्या आठवली आहे. केंद्रात भाजपचे सरकार येऊन अडीच वर्षे लोटली आहेत. एवढ्या दिवसांत काळ्या पैशाच्या मुद्द्यावर सरकारने काहीही कारवाई केली नव्हती. परंतु निवडणूक समोर दिसताच हा निर्णय घेण्यात आला. नव्वद टक्के लोक या निर्णयामुळे मोदींवर नाराज आहेत, असा दावाही मायावती यांनी केला. गुरुवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर आरोप केले.

गरीब, शेतकऱ्यांना झळ
मोदी सरकारच्या निर्णयाची सर्वाधिक झळ देशातील गरीब व शेतकरी जनतेला बसली आहे. हा निर्णय जन हिताचा नाही. सरकारचा हा निर्णय भांडवलदार, उद्योगपतींच्या फायद्याचा ठरला आहे. उद्योजकांना मदत केल्याने भाजपचाही फायदा झाला आहे. केंद्र सरकार गरीब जनतेचा मुळीच विचार करत नाही, असा आरोपही मायावती यांनी केला आहे.

शहा यांची तर ‘अंध भक्ती’
काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचे नागरिक नोटा बंद करण्यात आल्याच्या निर्णयाने हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे. परंतु भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मात्र या निर्णयाचे ‘सर्जिकल स्ट्राइक’ अशा शब्दांत कौतुक केले आहे. ही तर मोदींवरील ‘अंध भक्ती’ आहे, असा टोलाही मायावती यांनी लगावला.

एक-दोन वर्षांची कमाई
मोदी सरकारने अडीच वर्षांच्या काळात घेतलेल्या निर्णयामुळे भांडवलदारांचा व पक्ष म्हणून भाजपचा फायदा झाला. भाजपने दोन-एक वर्षे पुरतील एवढा पैसा जमा करून ठेवला आहे. सामान्यांचा त्यात काहीही फायदा झालेला नाही, असा दावाही मायावती यांनी केला आहे.
बातम्या आणखी आहेत...