आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पर्रीकरांचे वक्तव्य लष्कराचा अवमान करणारे’ , मायावतींनी केली सडकून टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - नियंत्रण रेषेच्या पलीकडील सर्जिकल स्ट्राइकच्या कारवाईबद्दल संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे वक्तव्य सैन्याचा अवमान करणारे आहे, असा हल्लाबोल बसपा प्रमुख मायावती यांनी केला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिकवणीच्या जोरावरच नियंत्रण रेषेपलीकडील सर्जिकल स्ट्राइकची कारवाई करणे शक्य झाले आहे, असे पर्रीकर यांनी म्हटले होते. वास्तविक कारवाईचे श्रेय लष्कराने देणे अपेक्षित होते, परंतु तसे झाले नाही. अगोदर त्यांनी त्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले होते. तेव्हाही लष्कराला गौण स्थान देण्यात आले होते. उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून भाजपने लष्करी कारवाईला देखील राजकीय मुद्द्याचे रूप देण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे, असा आरोप मायावती यांनी जारी केलेल्या पत्रकातून केला आहे. अहमदाबादमधील एका कार्यक्रमात पर्रीकर यांनी हे वक्तव्य केले होते. त्यावरून गदारोळ निर्माण झाला आहे.

श्रेय घेणे चुकीचे
निवडणुकीवर डोळा ठेवून लष्करी कारवाईचा राजकीय फायद्यासाठी वापर करणे चुकीचे आहे. खरे तर संघाची आेळख सांस्कृतिक संघटना म्हणून केली जाते. त्यामागे कोणताही राजकीय हेतू नाही, असे त्यांचे कार्यकर्ते सांगत असतात. परंतु प्रत्यक्षात मात्र संघाची मानसिकता काय आहे हे यातून दिसून आले आहे, असा आरोप मायावतींनी केला आहे.

यूपीत वाईट स्थिती
भाजप हा जातीयवादी पक्ष आहे. उत्तर प्रदेशात पक्षाला फारसे स्थान नाही. उलट लोकांचा पाठिंबा नाही. राज्यात भाजपची स्थिती वाईट आहे. त्यामुळे भाजपने देशभक्ती, राष्ट्रवाद इत्यादी मुद्द्यांचा राजकीय फायद्यासाठी वापर करून घेत आहे, असे मायावतींनी म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...