आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंद कुमार यांच्याकडे 1300 कोटींची 'माया', बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वांचे आहेत बंधू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - बहुजन पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांचे बंधू एवढीच ओळख असलेले आनंद कुमार यांच्या संपत्तीचा आलेख गेल्या काही वर्षात झपाट्याने वाढला आहे. सात वर्षांमध्ये आनंद कुमार यांची संपत्ती तब्बल 1300 कोटी रुपयांनी वाढली आहे.
 
आनंद कुमार यांच्या संपत्तीचा आलेख चढला तो 2007 ते 2014 या काळात. यातील पहिली पाच वर्षे त्यांच्या बहेनजी मायावती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2007 मध्ये आनंद कुमार यांची संपत्ती होती साडेसात कोटी रुपये. 2014 च्या अखेरीस त्यांची संपत्ती पोहोचली तब्बल 1 हजार 316 कोटींवर. 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आनंद कुमार यांनी रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली असून अनेक बेनामी कंपन्यांमध्ये त्यांची गुंतवणूक आहे. 
     
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)