आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीत मायावतींचे वादग्रस्त पोस्टर; मंत्र्याचे शिर कापताना दाखवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाथरस- उत्तर प्रदेशात मायावती यांच्या एका पोस्टरवरून वाद निर्माण झाला आहे. हादरस येथील सादाबाद भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली होती. त्यातील एका पोस्टरमध्ये मायावतींना कालीमातेच्या रूपात दाखवण्यात आले.

मायावतींच्या हातात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे शिर कापल्याचे दाखवण्यात अाले. त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनाही आक्षेपार्ह स्थितीत दाखवण्यात आले होते. या पोस्टरवरून तणाव निर्माण झाला. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्याला आक्षेप घेतला. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन हे पोस्टर जप्त केले. त्याला शाेभयात्रेतील कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला.