आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केंद्राने हल्ल्याचा निर्णय विलंबाने घेतला : मायावती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ - दहशतवाद्यांवर लष्करी कारवाई करण्याचा निर्णय केंद्र विलंबाने घेतला. खरे तर नऊ महिन्यांपूर्वी पठाणकोटवरील हल्ल्याच्या वेळीच हे पाऊल उचलायला हवे होते, असे बसपा प्रमुख मायावती यांनी म्हटले आहे.
निर्णय विलंबाने घेणारी भाजप आता मात्र निवडणुकीत त्या कारवाईचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप मायावतींना केला. त्या रविवारी जाहीर सभेत बोलत होत्या. निवडणूक जिंकण्यासाठी भाजप काेणतीही मर्यादा बाळगणार नाही. उरीच्या हल्ल्यातील शहिदांची चिंता शांतही झाली नाही, तोच राजकीय फायदा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनौमध्ये दसरा साजरा करण्यासाठी येणार आहेत. वास्तविक त्यांनी हा सण अत्यंत साधेपणाने साजरा करायला हवा होता. त्या म्हणाल्या, निवडणूक पाहणी पासून लोकांनी सावधानता बाळगली पाहिजे. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंडमध्ये बसपा स्वबळावर निवडणूक लढवेन आणि सरकारही स्थापन करेल.
भाजप सीबीआयचा वापर विरोधी पक्षांवर दबाव टाकण्यासाठी करत आहे. सरकार देशात छोट्या व्यावसायिकांचीही कुचंबणा करत आहे. मोठे उद्योजक मजेत आहेत. सरकार त्यांचे कर्ज माफ करू लागले आहे. निवडणुकीपूर्वी मोदींनी जनतेला मोठे स्वप्न दाखवले होते. आतापर्यंत गरीब व बेरोजगारांना काहीही लाभ मिळालेला नाही. भाजप सरकार अडीच वर्षांच्या काळात अद्यापही परराष्ट्र धोरण स्पष्ट करू शकलेले नाही, असा घणाघातही मायावतींनी केला. मुस्लिम समुदायाने आता समाजवादी पार्टीला मुळीच मतदान करू नये. कारण सपाला मतदान करणे म्हणजे अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करणे होईल. समाजवादी पार्टीने राज्यात गुंडाराज आणलेला आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था आणण्यासाठी बसपा सरकारची गरज आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जनतेने बसपाला निवडून दिले पाहिजे. भाजपच्या सरकारने राज्यात काही योजना देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे केले,असा आरोप मायवतींनी केला.
बातम्या आणखी आहेत...