आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महात्मा फुले यांना भारतरत्न मिळाले पाहिजे, मायावतींची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ - बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी महात्मा ज्योतीबा फुले आणि बसपचे संस्थापक कांशीराम यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. त्यासोबतच मायावती यांनी अटलबिहारी वाजपेयी आणि मालवीय यांच्या भारतरत्न पुरस्कारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मायावती यांनी लखनौ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रातील भाजप सरकारवर आरोप केला, की त्यांनी भारतरत्न देतांना पक्षपात केला आहे. मायावती म्हणाल्या, 'केंद्र सरकारने एकाच जातीच्या दोन व्यक्तींना एकाचवेळी भारतरत्न दिले आहे. यावरुन या सरकारचा इतर धर्मांबद्दलचा दृष्टीकोण स्पष्ट होतो.' मायावती म्हणाल्या, की महात्मा ज्योतीराव फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी महत्त्वाचे कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना भारतरत्न दिले पाहिजे.