आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mayawati Organised Caste Sammelan Against Alahabad High Court Judgement

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला बगल देत मायावतींचे जीतीय संमेलन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - बसपाप्रमुख मायावती यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश धुडकावत जातीनिहाय संमेलने सुरूच राहतील, असा निर्धार रविवारी व्यक्त केला. मायावती सर्व समाज भाईचारा सभेतून संमेलन घेणार आहेत. या सभांतून समाजात बंधुभाव निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस), बजरंग दल व विश्व हिंदू परिषद या संघटना जातीय तेढ निर्माण करत असल्यामुळे त्यांच्यावर बंदी लादण्याची मागणी मायावती यांनी केली. मायावती म्हणाल्या, देशाची समाज रचना जातीआधारित असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. सध्याच्या व्यवस्थेत ज्यांना मदत मिळत नाही, त्या जातीवर्गासाठी संमेलन घेणार आहे. उच्च न्यायालयाने गुरुवारी राजकीय पक्षांच्या जातीनिहाय संमेलनावर बंदी घातली होती. याबरोबर अशी संमेलने घटनाविरोधी असल्याचे म्हटले होते.


मोदींचे समर्थन करणा-या खासदाराला दम
मोदी यांना अनुकूल भूमिका घेणा-या आपल्या पक्षातील हमीदपूरच्या खासदाराला त्यांनी दम भरला आहे. भारत धर्मनिरपेक्ष देश आहे. मात्र, मोदी स्वत:ला हिंदू राष्‍ट्रवादी म्हणवून घेत आहेत. त्यांचे वक्तव्य कदापि मान्य होऊ शकत नाही. हमीदपूरचे खासदार विजय बहादूर यांनी मोदींचे समर्थन करणारे वक्तव्य करू नये, अन्यथा त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असा इशारा मायावती यांनी दिला.