आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीच्‍या तोंडावर मायावतींचे पुन्‍हा एकदा \'सवर्ण कार्ड\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- बहुजन समाज पक्षाच्‍या अध्‍यक्ष्‍या मायावती यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्‍हा एकदा 'सवर्ण कार्ड' खेळले आहे. निवडणुकीनंतर केंद्रात सरकार बनवण्‍यात त्‍यांच्‍या पक्षाची भुमिका निर्णायक अवस्‍थेत आली तर मुसलमान आणि उच्‍च जातीतील गरीबांना आरक्षण दिले जाईल, असे आश्‍वासन त्‍यांनी दिले. ब्राह्मण महासंमेलनात बोलताना त्‍यांनी लोकांना निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांकडून देण्‍यात येणा-या भेटवस्‍तूंपासून सावध राहण्‍याचा सल्‍ला दिला.

केंद्र सरकारकडून अन्‍न सुरक्षासारखे आणि राज्‍य सरकारकडून निवडणूकीत मिळणा-या आश्‍वासनांपासून सावध राहिले पाहिजे. कारण निवडणुकीनंतर हे कधीच पूर्ण होणार नाहीत. आकर्षित करणारी आश्‍वासने ही फक्‍त मते मिळवण्‍यासाठीच केली जात असतात, असे त्‍या म्‍हणाल्‍या.

यावेळी त्‍यांनी केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेशमधील अखिलेशसरकारवरही टीका केली. मायावती यांनी आपल्‍या पक्षाचा अजेंडा लागू करण्‍यासाठी पुन्‍हा एकदा सवर्ण, मुसलमान आणि इतर मागासवर्गीय जातींकडे पाठींबा मागितला.