आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदतपूर्व सार्वत्रिक निवडणूक शक्य: मायावती यांचे भाकीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड- देशातील एकंदर राजकीय परिस्थिती पाहता लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका शक्य आहेत, असे मत बसपा प्रमुख मायावती यांनी व्यक्त केले. मात्र, जनतेच्या हितांविरोधी धोरणे राबवत असले तरीही जातीयवादी शक्तींना सत्तेबाहेर ठेवण्याच्या एकमेव उद्देशाने यूपीए सरकारला बसपाचा बाहेरून पाठिंबा कायम राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
सार्वत्रिक निवडणुका निर्धारित वेळेत होवो अथवा मुदतीपूर्वी, बसपा निवडणुकीसाठी तयार आहे. निवडणुकीसाठी आमचा पक्ष पूर्ण शक्तीनिशी तयारी करीत आहे, असे त्या म्हणाल्या. अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी शनिवारी मुदतपूर्व निवडणुकांची शक्यता नाही, असे ठणकावून सांगितले असले तरीही मायावतींना निवडणुकीबाबत खोदून खोदून विचारले असता आताच काही सांगू शकणार नाही, असे त्या म्हणाल्या. परंतु एकंदर परिस्थिती पाहता निवडणुका मुदतीपूर्वी होऊ शकतील अशी पुस्तीही त्यांनी जोडली. बसपाचे संस्थापक दिवंगत कांशीराम यांची बहीण गुरशरण कौर यांच्या स्मरणार्थ आयोजित ‘शांतिपाठ’ कार्यक्रमासाठी त्या आल्या होत्या.

मोदी आमच्या पक्षात नाहीत : पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी आणि भाजपकडून नरेंद्र मोदींची दावेदारी प्रबळ होत असल्याबद्दल मायावतींनी थेट उत्तर देण्याचे टाळले. मोदी आमच्या पक्षात नाहीत, असे सांगून राहुल गांधींबाबत काँग्रेसच उत्तर देऊ शकेल, असे त्या म्हणाल्या.