आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mayawati Released List Of Lok Sabha Candidates From Uttar Pradesh

मायावतींनी एकाच यादीत जाहीर केले उत्तरप्रदेशातील सर्व 80 उमेदवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी उत्तरप्रदेशातील सर्वच्या सर्व 80 जागांवरील उमेदवारांची घोषणा आज (गुरुवार) केली आहे. मायावती यांनी पत्रकार परिषदेत राज्यातील 80 जागांपैकी 15 मतदारसंघात मागासवर्गीयांना उमेदवारी दिली असल्याचे सांगितले. त्याशिवाय 19 जागांवर त्यांनी मुस्लिम, 21 ब्राम्हण आणि 8 जागांवर क्षत्रियांना उमेदवारी दिली आहे. त्या म्हणाल्या, उमेदवारी देताना आम्ही 'सर्वजनां'चा विचार केला आहे. त्यासोबतच त्यांनी टप्प्या-टप्प्याने उमेदवार जाहीर करणा-या राजकीय पक्षांना टोला हाणला आहे. त्या म्हणाल्या, इतर पक्षांप्रमाणे आम्ही तुकड्यांमध्ये उमेदवार जाहीर केले नाही, तर एकाचवेळी राज्यातील सर्व जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे.
मोदी आणि मुलायमसिंहावर हल्ला
मायावती म्हणाल्या, आम्ही काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना सत्तेपासून रोखणार आहोत. काँग्रेस प्रत्येक क्षेत्रात अपयशी ठरली आहे. आम्ही केंद्रात यूपीए किंवा एनडीएला सत्तेत येऊ देणार नाही.
मायावतींनी आरोप केला, की मोदी आणि मुलायमसिंह या दोघांमध्ये पूर्वांचलमधून निवडणूक लढण्यासाठी गुपचूप करार झाला आहे. जातियवादाला प्रोत्साहन आणि धर्मनिरपेक्षतेवर हल्ला करण्यासाठीच भाजपने मोदींना वाराणसीतून तिकीट दिल्याचा आरोप त्यांनी केला.