आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायावतींची चप्पल साफ करणारा माजी स्वीय सचिव बसपातून निलंबित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - माजी मुख्यमंत्री मायावती यांची चप्पल रुमालाने स्वच्छ करणार्‍या माजी आयपीएस एस.पी. पद्मसिंह यांना बहुजन समाज पार्टीने पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. तिकिटासाठी दुसर्‍या पक्षाशी संधान बांधल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असून मायावतींच्या नावावर निधी जमवल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. 1989 मध्ये मायावती यांनी सिंह यांना खासगी सचिव म्हणून नियुक्त केले होते. मायावतींनी 2012 पर्यंत त्यांना सेवेत कायम ठेवले होते. पद्मसिंह यांनी पदावर असताना एका रॅलीमध्ये मायावतींची चप्पल रुमालाने स्वच्छ केली होती. त्यावेळी मायावती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या. मायावतींची सत्ता गेल्यानंतर सिंह आणि त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता.