आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एमबीएचे ऑनलाइन नि:शुल्क शिक्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची - फक्त 100 दिवसांत एमबीएचे नि:शुल्क ऑनलाइन शिक्षण देण्याची संकल्पना आयआयएम रांचीने अस्तित्वात आणली आहे. कोर्स माय बी स्कूल डॉट कॉम या संकेतस्थळावर नोंदणी करून या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येऊ शकतो. यासाठी फक्त ई-मेल आयडीचीच आवश्यकता असून कोणतेही नोकरदार किंवा विद्यार्थी या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात. चेन्नईचे के. के. स्वामिनाथन आणि आयआयएम रांचीने हा अभ्यासक्रम तयार केला आहे.

या अभ्यासक्रमाची रचना भारतीय बाजारावर आधारित आहे. अभ्यासक्रमाचे शिक्षण नि:शुल्क असले तरी प्रमाणपत्र हवे असल्यास मात्र शुल्क भरावे लागेल, परंतु हे शुल्कसुद्धा खूप कमी राहणार आहे. ऑनलाइन अभ्यासक्रम असल्यामुळे जगात कोठूनही ते शिकता येऊ शकते. संगणक, लॅपटॉप, स्मार्ट फोन किंवा टॅब्लेटवर सुद्धा हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. माय बी स्कूल डॉट कॉम या संकेतस्थळाचे एक पोर्टेबल क्लासरूम आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांना व्हिडिओ तासिकेनुसार शिकवले जाते.

ऑडिओ-व्हिडिओ अभ्यास साहित्य
ऑनलाइन मिनी एमबीए कोर्समध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी त्यांनी निवडलेल्या कोर्सनुसार अभ्यास साहित्य पाठवण्यात येते. सोबतच विद्यार्थ्यांसाठी 6000 ऑडिओ आणि 4588 व्हिडिओ लेक्चर्ससुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहे. याशिवाय ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातूनही अध्यापन करण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून विद्यार्थी प्रश्न विचारून शंकांचे निरसन करू शकतील. प्रश्न विचाराण्यासाठी विद्यार्थ्यांना आपले आयडी क्रमांक सांगावे लागेल.

या कोर्सचा समावेश
प्रोजेक्ट मॅनेजमेंट, सोशल मीडिया मार्केटिंग, प्रॉडक्शन अँड ऑपरेशन मॅनेजमेंट, फायनान्शियल मॅनेजमेंट, सप्लाय अँड चेन मॅनेजमेंट आणि बिझनेस स्ट्रॅटजी मॅनेजमेंट.