आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामलीलेतही मांसाहाराचा मुद्दा : मीट खाणाऱ्यांना ठेवले राम-सीता-हनुमानाच्या भूमिकेपासून दूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फैजाबाद - उत्तर प्रदेशातील रामलीलांमध्ये मांस खाणाऱ्यांना महत्त्वाच्या भूमिका दिला जाणार नाही. येथील मुमताजनगरमध्ये रामलीलेला 50 वर्षांची परंपरा आहे. येथे मुस्लिम कुटुंब मोठ्या संख्येने आहेत. एका इंग्रजी दैनिकानूसार, रामलीलेतील महत्त्वाच्या भूमिका मांस खाणाऱ्यांना देऊ नये अशी गैर-मुस्लिमांची इच्छा आहे.
काय आहे प्रकरण
मुमताजनगरमध्ये 1963 पासून रामलीला होत आहे. येथील टेलर नसीम यात महत्त्वाची भूमिका वठवतात. इतर महत्त्वाच्या भूमिकांमध्येही मुस्लिम कलाकारच असतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या परंपरेला छेद जात आहे. रामलीला कमिटीचे अध्यक्ष माजिद अली यांचे म्हणणे आहे, की काही लोकांनी रामलीलामध्ये महत्त्वाच्या भूमिका मुस्लिमांनी करण्यास आक्षेप घेतला आहे.
अली म्हणाले, 'रामलीलेच्या दरम्यानही मुस्लिम मांस खातात त्यामुळे त्यांना देवांची भूमिका देऊ नये अशी गैर-मुस्लिमांची इच्छा आहे. त्यामुळे आता आम्ही त्यांना छोट्या भूमिका दिल्या आहेत.'

का घेतला आक्षेप
रामलीला कमिटीचे सदस्य बलधारी यादव म्हणाले, 'रामलीला पाहाण्यासाठी आलेल्या महिला आणि पुरुष राम-लक्ष्मणाची भूमिका करत असलेल्या कलाकारांच्या पाया पडतात. त्यांच्या भावना लक्षात घेऊन मांस खाणाऱ्या मुस्लिम कलाकारांऐवजी आता या भूमिका हिंदूंना देण्यात आल्या आहेत. हिंदू आधी मांस खात असले तरी नवरात्रीत ते मांस खाणे बंद करतात आणि शाकाहार करतात.'