आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17 दिवसांनी तुरुंगात सोडले मेधा पाटकर यांनी उपोषण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धार/ सिरपूर- मध्य प्रदेशातील बडवानी येथे सरदार सरोवर धरणग्रस्तांनी  आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या १७ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण शनिवारी सोडले. मेधा पाटकर यांची प्रकृती ढासळत चालल्याचे पाहून हा निर्णय घेतला गेला. चिखल्दा येथून उपोषणकर्ते कोटेश्वर येथे आले आणि त्यांनी उपोषण सोडले. त्यानंतर तुरुंगात पाटकर यांनीही उपोषण सोडले.  लिंबूपाणी घेतल्यानंतर पाटकर यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यावरून डाळीचे पाणी घेतले आणि उपोषण संपवले, असे तुरुंग अधीक्षक सतीश उपाध्याय यांनी सांगितले.

धरणग्रस्त आणि नर्मदा बचाव आंदोलनच्या कार्यकर्त्यांनी चिखल्दा येथे सुरू असलेेले उपोषण शनिवारी कोटेश्वर तीर्थ येथे सोडले. या वेळी कनकबिहारी आश्रम कोटेश्वरचे अयोध्यादास महाराज,  सर्वोच्च न्यायालयाचे वकील संजय पारीक, अॅनी राजा, डॉ. सुनील, प्रमोद बागडी उपस्थित होते. नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर शेकडो कार्यकर्ते पोहोचले. सर्व धर्मांच्या गुरूंनी नर्मदा नदीची पूजा केली. त्यानंतर १४ उपोषणकर्त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...