आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीतील मंत्र्यांच्या पुतण्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानचे पहिले पंतप्रधाना लियाकत अली - Divya Marathi
पाकिस्तानचे पहिले पंतप्रधाना लियाकत अली
लखनौ - उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमधील जिल्हाधिकारी दिनशेचंद्र शुक्ला यांचा राहता बंगला, रेल्वेस्थानक, कंपनीचे उद्यान, शाळेसह शहरातील सुमारे सात अब्ज रुपयांच्या सरकारी संपत्तीचा सौदा झाला आहे. विशेष म्हणजे शुक्ला यांना त्याची पुसट कल्पनाही नाही.

याप्रकरणी राज्यमंत्री चित्तरंजन स्वरूप यांच्या पुतण्यासह सात आरोपींवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हे संपूर्ण प्रकरण म्हणजे मोठा घोटाळा असल्याचे शुक्ला यांचे म्हणणे आहे. ही जागा आमच्या मालकीची आहे. आम्ही त्याचे वारसदार आहोत, असा दावा चार व्यक्तींनी केला आहे. आपण पाकिस्तानचे असून तत्कालीन पंतप्रधान लियाकत अली यांचे वारसदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
बातम्या आणखी आहेत...