आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meerut Dharm Pariwartan Victim Allegedly Kill Imposed Family

LOVE JIHAD: धर्मपरिवर्तन- बलात्कारावर तरुणीची कोलांटउडी; म्हणाली, भाजप नेत्याने दिले 25 हजार रुपये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिडिओमेरठ (उत्तर प्रदेश) - येथील एका युवतीवरील गँगरेप आणि बळजबरीने धर्म परिवर्तन करण्याच्या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. पीडित तरुणीने म्हटले आहे, की माझ्यावर ना बलात्कार झाला ना माझे धर्म परिवर्तन करण्यात आले. तरुणीने तिच्या कुटुंबियांवरच आरोप केला आहे, की त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे.

तरुणीने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, राजकीय नेत्यांनी माझ्या कुटुंबाला पैसे देणे बंद केल्यानंतर त्यांनी मला मारहाण सुरु केली. मी जर वेळीच पोलिस स्टेशन गाठले नसते तर कदाचित त्यांनी मला मारुनही टाकले असते. पोलिसांनी तरुणीला जिल्हा न्यायाधिशासमोर हजर केले आणि तिचा जबाब नोंदवून घेतला. तिने आरोप केला आहे, की भाजप नेते विनित अग्रवाल यांनी 7 ऑगस्ट रोजी माझ्या कुटुंबाला 25 हजार रुपये दिले आणि पुढेही काही आर्थिक मदत लागली तर, करु असे आश्वासन दिले होते. तिला आता नारी निकेतन केंद्रात पाठवण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण
मेरठमधील खरखौदा पोलिस स्टेशन अतंर्गत येत असलेले सरावा गावातील एका हिंदू मुलीचे 30 जुलै रोजी अपहरण झाल्याचे तिच्या कुटुंबियांनी म्हटले होते. गावातील सरपंच आणि हाफिज नावाच्या व्यक्तीने साथिदारांच्या मदतीने हापूड या गावातून तिचे अपहरण केल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानंतर आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि तिचे धर्मांतर केल्याचाही आरोप लावण्यात आला होता. आरोपींच्या तावडीतून 3 ऑगस्ट रोजी सुटल्यानंतर तिने ही माहिती दिल्याचे तिच्या जुन्या तक्रारीत म्हटले होते.

पुढील स्लाइडमध्ये पाहा कुटुंबियांवर आरोप करणार्‍या तरुणीचा व्हिडिओ