आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meerut Girl Rape Incident Comes In Parliament, Leaders Blame UP Government

मेरठ धर्मांतरण: पीडितेच्‍या गर्भाधारणेबाबत DGP अन् IG मध्‍ये मतभिन्नता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोओळ -पीडित मुलीने कोर्टात साक्ष नोंदवली. सोबत तिची वकील)
मेरठ - उत्‍तर प्रदेशमधील मेरठ जिल्‍ह्यात एका मुलीवर धर्मांतरानंतर सामुहीक बलात्‍कार करण्‍यात आला आहे. एवढेच नव्‍हे तर मेडिकल रिपोर्टमध्‍ये पिडीत मुलीची गर्भपिशवी काढल्‍याची माहिती समोर आली आहे. मुजफ्फरनगरच्‍या हॉस्‍पीटलमध्‍ये पिडितेची गर्भपिशवी काढून टाकल्याचे सांगितले जात असून याविषयी तपास सुरु आहे. वैद्यकीय अहवालात पीडितेच्‍या गर्भाशयात 'फेलोपियन ट्यूब' नाही. या माहितीचे डीजीपी ए.एल.बॅनर्जी यांनी समर्थन दर्शविले. गृह सचिव कमल सक्‍सेना आणि IG (न्‍यायालय) अमरेंद्र संगर यांच्‍या मते वैद्यकीय अहवालात लैगिक शोषणाविषयी उल्‍लेख नाही. पीडितेच्‍या गर्भधारणेवरुन DGP अन् IG मध्‍ये मतभिन्‍नता दिसून येत आहे.

मुझफ्फरनगरमधील हॉस्पिटलमध्‍ये पीडितेवर उपचार सुरू असून दरम्यान तिची गर्भपिशवी काढून टाकल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिस याबाबत तपास करत आहेत. मंगळवारी (5ऑगस्ट) मेरठचे खासदार राजेंद्र अग्रवाल यांनी आरोपींवर लवकर कठोर कारवाई करण्‍याची मागणी केली आहे.
पीडितेला भविष्‍यात मातृत्त्व लाभणार नाही?
पीडितेची वेद्यकीय तपासणी केल्‍यानंतर गर्भाशयाला जोडलेली 'फेलोपियन ट्युब' काढून टाकल्‍याचे निदर्शनास आले आहे. त्‍यामुळे पीडितेला भविष्‍यात मातृत्त्व लाभणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोर्टात नोंदवला जबाब...
पीडितेची सोमवारी (4 ऑगस्ट) कोर्टात जबाब नोंदवला जाणार होता. परंतु तिच्‍या प्रकृतीमुळे ती नोंवलली नव्‍हती. त्‍यामुळे मंगळवारी तिचा जबाब नोंदवण्‍यात आली आहे.
परिस्थिती नियंत्रणात ...
या घटनेनंतर मेरठ शहरात तणाव निर्माण झाला होता. मात्र, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पो‍लिसांनी सांगितले. आरोपींना जेरबंद करण्‍यासाठी पोलिस पथके रवाना झालेची माहिती मिळा ली आहे.
तापले राजकारण...
या प्रकरणावरुन उत्तर प्रदेशचे राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्‍मीकांत यांनी म्‍हटले की, प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल द्यावी, अन्‍यथा त्याचा परिणाम वाईट होईल, असा इशाराही लक्ष्मीकांत यांनी दिला आहे.
बसपच्‍या सर्वेसर्वा मायावती यांनी म्‍हटले आहे की, समाजवादी पक्षाने घटनेचे गांभीर्य लक्षात घ्यावे, राज्यात कोणीच सुरळीत नाही.
काय आहे आरोप ?
गावातील सरपंच आणि त्याच्या साथीदारांनी पीडितेवर सामूहीक बलात्कार केल्याचा आरोप होत आहे. पीडितेच्या गावातील नागरिकांनी हा आरोप केला आहे.पीडितेने धर्मांतरास विरोध केला होता. म्हणून नराधमांनी तिच्यावर सामूहीक अत्याचार केल्याचे गावकर्‍यांचे म्हणणे आहे.

उल्लेखनिय म्हणजे आरोपी सरपंचाची मुलगी पीडितेची मैत्रीण आहे. पीडिता ही हापुडच्‍या मदरशामध्‍ये शिक्षिकेचे काम करत होती. हिंदी आणि इंग्रजी विषय शिकवत होती. तब्‍बल नऊ महिने शिकविल्‍यानंतर मदरशाच्या संचालक हाफिजने तिला धर्मांतर करावयास भाग पाडले. तिचे नाव 'बुशरा' ठेवण्‍यात आले. 29 जून रोजी हाफिजने त्‍याच्‍या सहका-यासोबत पीडितेचे अपहरण करुन तिच्यावर दुष्‍कर्म केले.

पुढील स्‍लाइडवर पाहा, घटनेची भीषणता दर्शवणारी काही छायाचित्रे.....