आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेरठच्या महापंचायतीत बॉलीवूड स्टाईल थरार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेरठ- मुजफ्फरनगर दंगल प्रकरणात अटकेतील भाजप आमदार संगीत सोम यांच्या सर्मथकांत व पोलिसांत उडालेल्या चकमकीत एक जखमी झाला. सोम सर्मथक खेरा गावात प्रतिबंधात्मक आदेश झुगारून महापंचायत घेण्याच्या प्रयत्नात होते. या दरम्यान ही चकमक उडाली. 60 जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

प्रकरण काय ?
सोमविरुद्ध रासुकाअंतर्गत कारवाई केल्याच्या निषेधार्थ सर्मथक महापंचायतीसाठी एकत्र आले होते. पोलिसांच्या लाठीमारात महिला जखमी झाल्याची अफवा पसरल्यानंतर जमाव आक्रमक झाला.
दगडफेक, अश्रुधुराचा मारा
ग्रामस्थांनी पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी हवेत गोळीबार केला व अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. संतप्त जमावाने सरकारी वाहने पेटवून दिल्याची माहिती मेरठचे विभागीय आयुक्त मनजित सिंग यांनी दिली.

खेरा गावातील महापंचायतीत सहभागी झालेला एक वृध्द हातात काठी घेऊन थेट पोलिसावर वीट फेकण्याचा प्रयत्न करीत होता परंतु पोलिसाने तत्काळ त्याच्यावर बंदूक रोखली.