आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meerut Zila » Bagpat » Drunk Constables Rape Pregnant Woman Baghpat Meerut News

सहा महिन्यांच्या गर्भवतीवर दोन पोलिसांचा बलात्कार, गोळीबार करुन एक जण फरार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बागपत (उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात दोन पोलिसांनी एका सहा महिन्यांच्या गर्भवती महिलेवर गँगरेप केल्याचे समोर आले आहे. पीडित महिलेचा आरोप आहे, की आरोपींनी तिच्या पतीला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली आणि तिच्यावर बळजबरी केली.
घटनेनंतर महिलेच्या पतीसह गावकर्‍यांनी आरोपींना घेरले तेव्हा एका पोलिस कर्मचार्‍याने बंदुकीतून गोळ्या झाडत पळ काढला. गावकर्‍यांनी दुसर्‍या पोलिसाल पकडून बेदम चोप दिला आणि त्याला पोलिसांच्या हवाली केले. दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बागपत जिल्ह्यातील बडौत पोलिस स्टेशन अंतर्गत गुरुवारी ही घटना घडली. सूत्रांच्या माहितीनुसार, एका प्रकरणाच्या तपासात पोलिस महिलेच्या घरी गेले होते. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, 'दोन पोलिस कर्मचारी माझ्या घरी आले. तेव्हा माझे पती शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते. पोलिसाने माझ्या डोक्यावर बंदूक ठेवून आळीपाळीने माझ्यावर अतिप्रसंग केला. माझे पती घरी आल्यानंतर पोलिसांनी त्यांना या घटनेची वाच्यता केली तर खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली. त्यानंतर गावकरी तिथे आले. तेव्हा त्यातील एकाने एक गोळीबार केला आणि पळून गेला.'
बागपतेच वरिष्ठ पोलिस अधिकारी शरद सचान म्हणाले, आरोपींना लवकर पकडले जाईल आणि त्यांच्यावर कडक कारवाई होईल.