आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet Sonia Narang An Ips Officer Victimized By Petty Politics

या लेडी IPSने CM विरोधात उघडला होता मोर्चा, BJP नेत्याच्या श्रीमुखात भडकावली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरु - बुलंद इरादे आणि प्रबळ आत्मविश्वासासाठी प्रसिद्ध कर्नाटकातील लेडी आयपीएस सोनिया नारंग सध्या कर्नाटकातील लोकायुक्त कार्यालयातील भ्रष्टाचाराच्या तपासामुळे चर्चेत आहेत. एक कोटी रुपये अवैध वसुलीचा आरोप लोकायुक्त वाय. भास्कर राव यांचा मुलगा आणि नातेवाईकांवर आहे. या भ्रष्टाचाराचा तपास करत असलेल्या लोकायुक्त एसपी सोनिया यांच्यावर तपास थांबवण्याचा दबाव वाढत आहे. याआधी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या श्रीमुखात भडकावली होती. त्यासोबतच खाण घोटाळ्यामुळेही त्या चर्चेत होत्या.
कोण आहे सोनिया नारंग
सोनिया नारंग कर्नाटक कॅडरच्या 2002 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी 1999 मध्ये पंजाब विद्यापीठातून समाजशास्त्रातील गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्यांचे वडील देखील प्रशासकीय अधिकारी होती. सोनिया सध्या कर्नाटक लोकायुक्त एसपी आहेत.

भाजप नेत्याच्या श्रीमुखात भडकवली
सोनिया नारंग यांची 13 वर्षांच्या कारकीर्दीत कर्नाटकातील अनेक मोठ्या शहरांमध्ये पोस्टींग झाली. या दरम्यान त्या जिथे जातील तिथे गुन्हेगारांनी गाशा गुंडाळल्याचे चित्र होते. 2006 मध्ये एका कार्यक्रमादरम्यान राज्यातील कांग्रेस आणि भाजपच्या दोन दिग्गज नेत्यांमध्ये जुंपली होती. तेव्हा आयपीएस सोनिया यांनी सर्वांसमक्ष भाजप नेते रेणुकाचार्य यांच्या श्रीमुखात लगावली होती. नंतर हेच रेणुकाचार्य मंत्री देखील झाले होते. तेव्हा सोनिया देवगिरी जिल्ह्याच्या अधीक्षक होत्या. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अनेकदा त्यांना सन्मानित देखील करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांनी खेचले होते घोटाळ्यात
कर्नाटकातील खाण घोटाळ्यात आयपीएस सोनिया नारंग यांचे नाव स्वतः मुख्यमंत्र्यांनी घेतले होते. 16 कोटींच्या या घोटाळ्यावर विधानसभेत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अधिकाऱ्यांचे नावे जाहीर केली होती. त्यात सोनिया यांचे नाव आल्याने प्रशासन आणि राजकीय वर्तुळात जणू भूकंप आला होता. सिद्धरामय्यांच्या आरोपांचे सोनिया यांनी खंडन केले होते. त्यासोबतच त्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात मोर्चाच उघडला होता. त्या म्हणाल्या होत्या, 'माझा अंतरात्मा सांगत आहे की मी कोणतीही चूक केलेली नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरी जाण्यास मी तयार आहे. मी सर्व आरोप फेटाळून लावते त्याच बरोबर त्यांचा कायदेशीर विरोध करणार आहे.' त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या विरोधात दोन हात करण्यासाठी कंबर कसली होती.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कर्नाटकच्या आयपीएस अधिकारी सोनिया नारंग यांचे फोटोज्...