आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet Transgender C.Devi Who Will Take On Jayalalitha In Tamil Nadu Polls

अम्मांच्या विरोधात ट्रान्सजेंडर सी. देवी निवडणूक लढवणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - पुढल्या महिन्यात होऊ घातलेल्या तामिळनाडूतील विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच अण्णा द्रमुकच्या मुख्यमंत्री जयललिता यांना ट्रान्सजेंडर उमेदवार सी. देवी यांचा मुकाबला करावा लागणार अाहे, अशी बातमी आली आहे. त्यामुळे मुकाबला रंजक ठरणार असल्याचे सांगितले जाते.

३३ वर्षीय सी. देवी यांनी जयललिता यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचे शनिवारी जाहीर केले. आर. के. नगर या मतदारसंघातून हा मुकाबला पाहायला मिळेल. देवी मूळच्या सालेम जिल्ह्यातील आहेत. तामीळ पार्टी आणि नाम तामिलर काछीच्या वतीने त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्या १६ वर्षांच्या असताना त्यांना आपण ट्रान्सजेंडर असल्याची जाणीव झाली होती. त्यामुळे १७ व्या वर्षी त्यांनी लिंग परिवर्तनाची शस्त्रक्रिया केली होती. २००४ पासून देवी ट्रान्सजेंडर समुदाय आणि सेक्स वर्करसाठी सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. २००९ मध्ये त्यांनी थैमाडी नावाचे अनाथालय सुरू केले. त्यात ६० हून अधिक अनाथांना आश्रय मिळाला आहे. दरम्यान, नाम तामिलर काछी पक्षाच्या स्थापनेपासून कार्यरत आहे. मला गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्य सुविधा या क्षेत्रात मतदारसंघातील नागरिकांसाठी भरीव कार्य करण्याची इच्छा आहे, असे देवी यांनी सांगितले. जयललिता यांना देवी यांनी दिलेले आव्हान कितपत तग धरते हे पुढील महिन्यातील मतदानानंतरच स्पष्ट होईल. परंतु तोपर्यंत तरी देवी यांच्या निर्णयामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. राज्यात २३४ जागांसाठी १६ मे रोजी मतदान होणार आहे.

टीएमसी-डीएमडीके-पीडब्ल्यूएफचीआघाडी :
डीएमडीकेचेप्रमुख तसेच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार विजयकांत यांच्या नेतृत्वाखाली आघाडीसोबत जी. के. वासन यांच्या तमिळ मनीला काँग्रेसने हातमिळवणी केली आहे. त्यामुळे आता ही तीन पक्षांची मोट बनली आहे. त्यात पीडब्ल्यूएफही आहे. डीएमडीके राज्यात २० जागा लढवणार आहे. डीएमडीके १०४ जागा लढवेल.
तिसरा का नको ?
गरिबांना अधिक चांगल्या प्रकारे जगता यावे यासाठी मी प्रयत्न करत आहे. त्यांना पिण्यासाठी पाणी, रोजगार मिळायला हवा. परंतु हे करताना स्त्री-पुरुषांनीच का म्हणून देशाचे भाग्य ठरवावे ? तिसरे का चालू शकत नाहीत ? असा रोकडा प्रश्न सी. देवी यांनी उपस्थित करून मतदारांना आवाहन केले आहे.