आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्जिकल स्ट्राइकची माहिती २८ खासदारांना देणार, राहुल गांधी, सुप्रिया सुळेंचा समावेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - परराष्ट्र सचिव आणि डीजीएमओ हे दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या सर्जिकल स्ट्राइकबद्दल मंगळवारी परराष्ट्र मंत्रालयाच्या संसदीय समितीला माहिती देतील. शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील समितीत राहुल गांधी, वरुण गांधी, सुप्रिया सुळे यांच्यासह २८ खासदारांचा समावेश आहे. लष्कराने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये २८-२९ सप्टेंबरला हे हल्ले केले होते.

लोकसभा सचिवालयाने दिलेल्या माहितीनुसार, परराष्ट्र मंत्रालयाच्या संसदीय समितीची मंगळवारी बैठक होईल. या बैठकीत परराष्ट्र सचिव, संरक्षण सचिव आणि लष्करी कारवाईचे महासंचालक (डीजीएमओ) हे खासदारांना सर्जिकल स्ट्राइकबाबत माहिती देतील. सरकारने आधी या संसदीय समितीला अशी माहिती देण्यास नकार दिला होता.
बातम्या आणखी आहेत...