आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: सूर्य न पाहिलेले मासिनराम, पाहा मेघालयातील पावसातले ओले गाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्‍या देशात मासिनराम नावाचे एक गाव आहे, जिथे वर्षभर पाऊस पडतो. देशभरात मान्‍सूनच्‍या अगमनानंतर पाऊस येतो. मेघालयातील या गावात मात्र प्रत्‍येक दिवशी पाऊस पडतो. पावसामुळे वर्षेभर या भागातील जमीन ओली असते. प्रत्‍येक दिवशी पाऊस पडत असल्‍यामुळे कधीतरी सूर्य दर्शन होते. या गावाला सुर्य न पाहिलेले गाव म्‍हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही.

भारताचा उत्तर भाग पृथ्‍वीवरील नंदनवन म्‍हणून ओळखले जाते. या भागात दुष्‍काळ कधी पडत नाही. निसर्गाने भरभरून नैसर्गिक सौदंर्याची उधळण या भागात केली आहे. या भागाला भेट देण्‍यासाठी जगभरातील हाजारो पर्यटक येत असतात. चेरापूंजी भागामध्‍ये सदासर्वकाळ पाऊस असल्‍यामुळे सहाजीकच या भागात पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळते. मात्र चेरापूंजी जवळ मासिनराम गावात प्रत्‍येक दिवशी पाऊस पडतो. या गावातील जमीन आजपर्यंत वाळलेली नाही. वर्षेभरात सर्वात जास्‍त पाऊस या गावात पडल्‍याची नोंद करण्‍यात आली आहे. प्रत्‍येक वर्षी मासिनराम गावात 467 इंच पाऊस पडतो.
पुढील स्‍लाईडवर पाहा मेघालयातील या गावाची फोटो...