आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेहबूबा मुफ्ती यांचा शपथविधी, भाजपला या वेळी दोन जास्त कॅबिनेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी सोमवारी जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळातील २१ मंत्र्यांचाही शपथविधी झाला. भाजपला या वेळी दोन जास्त कॅबिनेट मंत्रिपदे मिळाली आहेत.
राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी मेहबूबा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मेहबूबा यांनी उर्दूत शपथ घेतली. त्यानंतर भाजपचे नेते निर्मलसिंह यांना शपथ देण्यात आली. ते या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री असतील. पीडीपीच्या नऊ, तर भाजपच्या सहा कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. पीडीपीच्या वाट्याला २, तर भाजपच्या वाट्याला ३ राज्यमंत्रिपदे आली आहेत. भाजपचा मंत्रिमंडळातील वाटा या वेळी वाढला आहे. गेल्या वेळी भाजपकडे सहा कॅबिनेट मंत्रिपदे होती. या वेळी त्यात दोनने वाढ झाली आहे.
कॅबिनेट मंत्री : अब्दुल रेहमान विरी, गुलाम नबी लोन, अब्दुल हक खान, बशरत बुखारी, हसीब द्राबू, चौधरी झुल्फिकार अली, नईम अख्तर आणि
इम्रान अन्सारी (सर्व पीडीपी), निर्मल सिंह, चंदरप्रकाश, बाली भगत, लाल सिंग, सज्जाद लोन, चेरिंग दोरजे, अब्दुल गनी कोहली, श्यामलाल चौधरी (सर्व भाजप).
राज्यमंत्री : आयेशा नकाश, झहूर मीर आणि फारूक अंद्राबी (सर्व पीडीपी) आणि सुनीलकुमार शर्मा, प्रिया सेठी व अजय नंदा (सर्व भाजप).
कर्रा यांचा बहिष्कार : मंत्रिमंडळात नवीन मंत्र्यांना संधी न दिल्याने तसेच तीन मंत्र्यांच्या समावेशाला आक्षेप असल्याने पीडीपीचे ज्येष्ठ नेते खासदार तारिक अहमद कर्रा यांनी शपथविधीवर बहिष्कार टाकला.
भाजपच्या वाट्याला दोन अतिरिक्त कॅबिनेट मंत्रिपदे

केंद्रीय मंत्र्यांना झाला उशीर
मेहबूबा मुफ्ती आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, जितेंद्र सिंह आणि हरसिमरत कौर बादल हे विशेष निमंत्रित होते. मात्र, ते १५ मिनिटे उशिरा राजभवनात पोहोचले. तोपर्यंत मेहबूबा मुफ्ती आणि निर्मलसिंह यांचा शपथविधी आटोपला होता.