आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरमध्ये हिंसेचा 48 वा दिवस: राजनाथ पोहोचले, पॅलेट गनला देणार पर्याय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - काश्मीरमध्ये पॅलेट गन वापरावी किंवा नाही याबाबत विचार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती काश्मीर दौऱ्यावर गेलेले केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह गुरुवारी दिली. या गनला पर्याय देण्याबाबत विचार सुरु असल्याचे राजनाथ म्हणाले. गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती देखील उपस्थित होत्या.

केंद्रावर नाराज आहे का महबूबा मुफ्ती
- राजनाथसिंह आणि महबूबा मुफ्ती यांनी आज (गुरुवार) श्रीनगरमध्ये पत्रकार परिषद घेतली.
- त्याआधी अशी चर्चा होती की बुधवारी राजनाथसिंह काश्मीरमध्ये पोहोचले तेव्हा त्यांच्या स्वागताला सीएम मुफ्ती गेल्या नव्हत्या. अरुण जेटली यांच्या वक्तव्याने त्या नाराज असल्याची चर्चा होती.
- काश्मीर खोऱ्यातील अशांततेचे वातावरण 40 दिवस झाले तरी पूर्वपदावर आलेले नाही. अनेक भागांमध्ये अजूनही संचारबंदी लागू आहे. कुठे हिंसा तर कुठे आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राजनाथसिंह काश्मीर दौऱ्यावर आले आहेत.
- त्यांनी काश्मीरला येत असल्याचे ट्विट केले होते. भारतीय घटनेच्या चौकटीत राहून शांततेसाठी काय करता येईल यासंबंधी जनतेकडून सूचना मागवल्या होत्या. राजनाथ यांचा एका महिन्यात हा दुसरा काश्मीर दौरा आहे.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, काय म्हणाल्या महबूबा मुफ्ती
बातम्या आणखी आहेत...