आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेहबुबा होणार काश्मीरच्या सीएम; एप्रिलमध्ये घेणार पद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू- काश्मीरमध्ये मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांनी शुक्रवारी त्यांच्या राजकीय वारसदाराबाबतच्या सर्व शक्यतांना पूर्णविराम दिला. अनंतनाग येथील खासदार व त्यांच्या कन्या मेहबुबा मुफ्ती याच जम्मू काश्मीरच्या भावी मुख्यमंत्री असतील. पुढील वर्षी एप्रिलमध्ये त्या राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळतील, अशी घोषणा सईद यांनी केली आहे.

आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत सईद यांनी वरील घोषणा केली. या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यासाठी जाहीर केलेल्या ८० हजार कोटी रुपयांच्या पॅकेजबाबत विस्ताराने माहिती िदली. पत्रकारांनी त्यांना मेहबुबा मुफ्तींकडे मुख्यमंत्रीपद सोपण्याबाबत प्रश्न विचारले. त्या वेळी सईद म्हणाले की, मेहबुबा अनेक वर्षांपासून पक्षात सक्रीय आहेत व जबाबदारी व्यवस्थित सांभाळत आहेत.लोकांमध्ये त्या लोकप्रिय आहेत. त्यांना पीडीपी प्रमुख बनवल्यानंतर राज्यात पक्षाने चांगली कामगिरी करून २०१४ च्या निवडणुकीत लोकसभेच्या तीन जागा तसेच विवधानसभेच्या २८ जागा जिंकल्या आहेत.

त्याआधी पीडीपीने २००८ मध्ये २१ जागा जिंकल्या होत्या. तुमच्या पक्षात असंतोष आहे काय? असे विचारले असता ते म्हणाले, पक्षात सर्वांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे. लोकांत चर्चा झाली पाहिजे. लोकशाहीसाठी तेच चांगले आहे. बारामुला येथील पीडीपीचे खासदार व सर्वोच्च न्यायालयातील वकील मुजफ्फर हुसेन बेग व श्रीनगरचे खासदार तारीक हामीद कर्रा पक्षाच्या कार्यपद्धतीबाबत नाराज आहेत.

एप्रिलमध्ये घेणार पद
सूत्रांनुसार, या वर्षी किंवा पुढील वर्षी एप्रिलपर्यंत मेहबुबा मुफ्तींना मुख्यमंत्रीपदी दिले जाऊ शकते.परंतु अंतर्गत मतभेद व नेतृत्वाच्या ओढाताणीत पक्षात फूट पडण्याचा धोका सईद यांना वाटतो आहे. त्यामुळे ते कन्या मेहबुकांकडे राजकीय वारसा सोपवू इच्छितात. त्या भाजप - पीडीपी समन्वय समितीच्या सदस्य आहेत. व पक्षाच्या कामकाजाशिवाय सरकारच्या मोठ्या योजनांच्या अमलबजावणीचा आढावा घेण्याचे काम त्या करतात.
बातम्या आणखी आहेत...