आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: काश्मीरात दगडफेक करणाऱ्यांचे 300 व्हॉट्सअॅप ग्रुप, महबूबा मुफ्तींनी घेतली मोदींची भेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्यातील महत्वाच्या मुद्यांवर अर्धा तास चर्चा सुरू राहिली. - Divya Marathi
राज्यातील महत्वाच्या मुद्यांवर अर्धा तास चर्चा सुरू राहिली.
नवी दिल्ली - जम्मू आणि काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांना गोळा करण्यासाठी व्हॉट्सअॅपवर तब्बल 300 ग्रुप तयार करण्यात आले. या प्रत्येक ग्रुपवर 250 सदस्य आहेत. सुरक्षा रक्षकांच्या चकमकीत अडथळे आणणे हा त्यांचा मुख्य हेतू असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. तर दुसरीकडे, काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी राज्याच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास राज्यातील महत्वाच्या मुद्यांवर चर्चा पार पडली.
 
चर्चेतूनच तोडगा काढण्यास प्राधान्य
- महबूबा मुफ्ती म्हणाल्या, "राज्यात वाईट होत चाललेल्या परिस्थितीवर पंतप्रधान मोदी यांच्या भेटीत प्रामुख्याने चर्चा झाली. राज्यातील आमच्या युतीवर सुद्धा चर्चा झाली. सिंधू पाणी वाटपाच्या करारामुळे आम्हाला नुकसान होत आहे. त्यावर आपल्या लोकांसोबत चर्चा करून यातून मार्ग काढण्यात यावा असे मुद्दे पंतप्रधानांसमोर मांडले आहेत."
- "सुशान आणि चर्चा ह्या दोन्ही गोष्टी एकदाच कार्यरत होतील असा आमचा प्रयत्न आहे. राज्यात सुव्यवस्थित परिस्थिती लागू केल्याशिवाय पर्याय नाही."
- "दगडफेक करणाऱ्यांना भडकावले जात आहे, त्यावर सुद्धा आम्ही प्रामुख्याने चर्चा केली."
 
 
इतर राज्यांनी काश्मीरसाठी कार्यक्रम आयोजित करावे
- जम्मू आणि काश्मीरच्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या राज्यांमध्ये शिकण्याची संधी मिळावी. यासाठी इतर राज्यांनी काश्मीरात कार्यक्रम आयोजित करावे असे आवाहन रविवारच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी केले. 
- नुकतेच झालेल्या अनंतनाग पोटनिवडणुकीत हिंसाचार झाला. त्यामध्ये 8 जणांच्या मृत्यूंची नोंद झाली. या जागेवर नॅशनल काँफ्रेन्सचे फारुख अब्दुल्ला यांनी विजय मिळवला. 
- 2015 मध्ये जम्मू-काश्मीरात भाजप-पीडीपी सरकार बनल्यानंतर दगडफेकीच्या घटनांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली. 
 
गेल्या आठवड्यातच लष्करप्रमुख बिपीन रावत आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी या राज्यातील परिस्थितीवर चर्चा केली. 
 
90% व्हॉट्सअॅप ग्रुप बंद केले
- एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीप्रमाणे, दगडफेक करणाऱ्यांच्या टोळ्या बोलावण्यासाठी तयार करण्यात आलेले व्हॉट्सअॅप ग्रुप आणि ग्रुप अॅडमिनची ओळख पटली आहे. पोलिसांनी त्यांना काउंसलिंगसाठी बोलावले आहे. याचे चांगले परिणाम पुढे येत असून गेल्या 3 आठवड्यांत 90% व्हॉट्सअॅप ग्रुप बंद करण्यात आले आहेत. 
- यासोबतच, दगडफेक करणाऱ्या घटना टाळण्यासाठी या भागात इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या होत्या. त्याचा देखील फायदा झाला.
 
पुढील स्लाइडवर पाहा काय म्हणाल्या महबूबा मुफ्ती....Video
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)​
 
बातम्या आणखी आहेत...