आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mehbooba Mufti Praised Narendra Modi: Says Modi Is The Only Man Who Helps Us, Kashmir Unrest

मोदीच आम्हाला दलदलीतून बाहेर काढू शकतील : मेहबूबा मुफ्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आम्हाला कुणी या चिखलातून बाहेर काढू शकत असेल तर ते केवळ मोदीच आहेत. - महबूबा (फाईल) - Divya Marathi
आम्हाला कुणी या चिखलातून बाहेर काढू शकत असेल तर ते केवळ मोदीच आहेत. - महबूबा (फाईल)
श्रीनगर - काश्मीरला दलदलीतून केवळ नरेंद्र मोदीच काढू शकतात. ते लाहोरला गेले होते. हीच गोष्ट त्यांची शक्ती दाखवणारी आहे. मोदींनी घेतलेल्या निर्णयाला संपूर्ण देशाचे समर्थन मिळेल, असा विश्वास जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केला.
 
मेहबूबा शनिवारी महिलांच्या एका कार्यक्रमात बोलत होत्या. त्या म्हणाल्या, काश्मीरची परिस्थिती अधिक बिघडल्यास त्याचा परिणाम जम्मू व लडाखमध्येही दिसून येणार आहे. काश्मिरची समस्या ७० वर्षे जुनी आहे. माझे वडील मुफ्ती मोहंमद सईद व अटल बिहारी वाजपेयी यांनी काश्मिरमध्ये शांती प्रक्रियेची सुरुवात केली होती. आता माझे हयात नाहीत. वाजपेयी सरकारही नाही. यूपीए सरकारला काश्मिरमधील परिस्थिती सुधारत असल्याचे वाटत होते. परंतु वास्तवात स्थिती आणखीनच बिकट होत चालली आहे. कोणालाही कायदा हाती घेण्याची
परवानगी नाही. 
 
आपल्याला सर्व दलदलीतून केवळ मोदीच बाहेर काढू शकतील. त्यांनी निर्णय घेतल्यावर संपूर्ण देश त्याचे समर्थन करेल. पूर्वीचे पंतप्रधान देखील पाकिस्तानला जाऊ इच्छित होते. परंतु हिंमत केली नाही. मोदी लाहोरला गेले. यावरून त्यांची शक्ती लक्षात येते, असे मेहबूबा यांनी सांगितले. 
 
...तर, लद्दाकवर सुद्धा वाईट परिणाम
- महिलांच्या एका कार्यक्रमात त्यांनी काश्मीरच्या वाईट होत चाललेल्या परिस्थितीवर मोदीच तोडगा काढू शकतील अशी उमेद केली आहे. या कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या, "काश्मीरमध्ये परिस्थिती वाईट होत असल्यास त्याचे दुष्परिणाम जम्मू आणि लद्दाकमध्ये सुद्धा दिसून येतील. काश्मीरचा प्रश्न 70 वर्षे जुना आहे. 
- माझे पिता मुफ्ती मोहम्मद सईद आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी काश्मीर शांतता प्रक्रिया सुरू केली होती. आता वडील या जगात नाहीत आणि वाजपेयी यांची सत्ता देखील नाही. यूपीए सरकारने वेळोवेळी काश्मीरची परिस्थिती सुधारत असल्याचा दावा केला. मात्र, प्रत्यक्षात त्याहून वाईट अवस्था झाली. 
 
लाहोरला जाऊन ताकद दाखवली
- आम्हाला कुणी या चिखलातून बाहेर काढू शकत असेल तर ते केवळ मोदीच आहेत. त्यांनी निर्णय घेतल्यास संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी राहील. 
- यापूवर्वीही काही पंतप्रधानांनी पाकिस्तानला जाण्याचा इच्छा व्यक्त केली. तरीही त्यांनी प्रत्यक्ष धाडस दाखवला नाही. मोदी लाहोरला गेले हे त्यांच्या ताकदीचे प्रतिक आहे. 
- जम्मू काश्मीर एक पर्यटन स्थळ आहे. आम्हाला त्या दृष्टीकोनातून राज्याचा विकास करायला हवा.
 
अचानक लाहोर पोहोचले होते मोदी
- 25 डिसेंबर 2015 रोजी सकाळी 11.30 च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवाज शरीफ यांना दूरध्वनीवरून त्यांच्या 66 व्या जन्मदिनी शुभेच्छा दिल्या. 
- पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एजाज चौधरी यांनी सांगितल्याप्रमाणे, नवाज यांनी मोदींना प्लीज, येऊन आमचे पाहुणे व्हा आणि आमच्या सोबत चहा घ्या. अशी विनंती केली. 
- त्यावर मोदींनी हो, मी येऊ शकतो असे म्हटले.
- मोदी जेव्हा लाहोर विमानतळावर दाखल झाले, तेव्हा शरीफ म्हणाले, तर... अखेर आपण आलात... 
- मोदी म्हणाले, निश्चितच, का नाही. यावेळी दोघांनी एकमेकांना स्माईल दिली आणि गळाभेट घेतली होती.
 
पुढील स्लाइडवर वाचा, आयएसआय देते काश्मिरी फुटिरांना दरमहा ७० लाख...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...