आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mehbooba Mufti To Be Sworn In As Jammu & Kashmir\'s First Woman Chief Minister On Monday

J&K ला मिळाली पहिली महिला मुख्यमंत्री; मेहबूबा मुफ्ती यांनी घेतली शपथ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांना जम्मू- काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्रीचा बहुमान मिळाला आहे. राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी 56 वर्षीय मेहबूबा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. भाजपचे डॉ.निर्मल सिंह यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजप-पीडीपी सरकारमधील 6 कॅबिनेट व 8 राज्यमंत्रींनी शपथ देण्यात आली.

कॉंग्रसने का केले बॉयकॉट?
- कॉंग्रेस प्रदेश पक्षाचे प्रमुख प्रवक्ते रविंदर शर्मा यांनी सांगितले की, मेहबूबा मुफ्ती शपथविधी कार्यक्रमापासून लांब राहण्याचा निर्णय घेण्यात आला. पीडीपी-भाजपने चुकीच्या पद्धतीने एकत्र येऊस सरकार स्थापन केले आहे.
- भाजप-पीडीपीने जम्मू-काश्मीरच्या जनतेचा विश्वासघात केला आहे. जनतेने दिलेल्या मतांची त्यांना किंमत नाही. दोघांनी एकमेंकांच्या आयडियोलॉजीविरुद्ध निवडणूक लढवली. नंतर मात्र, एकत्र येऊन सत्तेवर आले, असा आरोप कॉंग्रेसने केला आहे.

मेहबुबा मुफ्तीसह कोणी-कोणी घेतली मंत्रीपदाची शपथ..
पीडीपी
- अब्दुल हक खान
- गुलाम नबी लोन
- सैयद बशारत अहमद बुखारी (कोशुर भाषेत घेतली शपथ)
- हसीब द्राबू
- सैयद नईम अख्तर अंद्राबी
- असिया नकाश

भाजप
- निर्मल सिंह
- बाली भगत
- चौधरी लाल सिंह (डोगरी भाषेत घेतली शपथ)
- अब्दुल गनी कोहली
- सुनील कुमार शर्मा
- प्रिया सेठी
- पीपुल्स कॉन्फ्रेंस के नेता सज्जाद लोन
- शेरिंग दोरजी

केंद्रीय मंत्री व्यंकेया नायडू व जितेंद्र सिंह प्रमुख पाहुणे...
- राजभवनात 11 वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली.
- शपथविधीला केंद्रीय मंत्री व्यंकेया नायडू व जितेंद्र सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
- काश्मीरमधील पीडीपीचे साथीदार असलेल्या भाजपाचे नेते राम माधव यांच्यासह राज्याचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्लाही उपस्थित होते.
- पीडीपीच्या मंत्र्यांची टीम जैसे थे असून भाजपमध्ये एक बदल करण्‍यात आला आहे.
- भाजपच्या पवन गुप्ता यांच्या जागेवर आमदाराला कॅबिनेटमध्ये संधी देण्यात आली आहे. याशिवाय तीन मंत्रीपदामध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे.
- दरम्यान 7 जानेवारीला मुफ्ती मोहम्मद सईद यांचे निधन झाले होते. त्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.

टॉप 20 महिलांना निमंत्रण...
- मेहबुबा मुफ्ती यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाचे 600 पाहुण्यांना निमंत्रित करण्‍यात आले होते. त्यात 20 महिला खास होत्या.
- कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, तमिलनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांचा समावेश होता.

दरम्यान, मेहबुबा मुफ्ती या राज्याच्या 13 व्या मुख्यमंत्री बनल्या आहेत. त्यांच्यासोबत 16 कॅबिनेट मंत्री आणि 8 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. 8 राज्यमंत्र्यांपैकी भाजपच्या दोघांना स्वतंत्र प्रभार देण्यात येणार आहे.

पीडीपीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मंत्रिमंडळातील पक्षाचे सर्व मंत्री कायम राहतील. भाजपने मात्र याआधीच्या मंत्रिमंडळातील राज्यमंत्री पवनकुमार गुप्ता यांना वगळण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या जागी नवा चेहरा आणण्यात येईल. अपक्ष आमदाराला मंत्रिपद देण्याऐवजी आपल्याच पक्षाच्या आमदाराला संधी द्यावी, असा आग्रह पक्षाच्या आमदारांनी धरला होता. गुप्ता हे सईद यांच्या मंत्रिमंडळात अर्थ राज्यमंत्री होते.
मेहबूबा यांचे रविवारी दुपारी कुटुंबियांसह जम्मूत आगमन झाले. शपथविधीपूर्वी त्या नियोजित उपमुख्यमंत्री निर्मलसिंह यांची भेट घेतील. भाजपतर्फे केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू आणि जितेंद्र सिंह शपथविधीला विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहेत.

दोन्ही पक्षांकडील खाती कायम राहणार
गेल्या वर्षी झालेल्या करारानुसार दोन्ही पक्षांकडील खाती कायम राहतील. या करारानुसार गृह, अर्थ, महसूल, कायदा आणि न्याय तसेच शिक्षण ही खाती पीडीपीकडे असतील. भाजपला आरोग्य, नगरविकास, ऊर्जा, वाणिज्य आणि उद्योग तसेच सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी ही खाती मिळतील.