आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातून ISISचे ट्विटर अकाऊंट हाताळणार्‍या मेहदीला बंगळुरुत अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुर - ब्रिटनच्या चॅनल 4 न्यूजने ज्या भारतीयाचे दहशतवादी संघटना आयएसआयएसचे ट्विटर अकाऊंट चालवत असल्याचा आरोप केला, त्याला बंगळुरु पोलिसांनी अटक केली आहे. त्याआधी मेहदी मसरुर बिस्वास नामक या व्यक्तीने एका इंग्रजी दैनिकाला फोनवर बोलताना सांगितले होते, की मला पोलिसांची भीती वाटते. चॅनल 4 न्यूजने देखील त्याच्याशी संपर्क साधला होता. तेव्हा त्याने शिरच्छेद करणे हा इस्लाममधील एक अविभाज्य भाग असल्याचे सांगितले होते.
मुळचा कोलकाता येथील असलेला मेहदी याने त्याचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचे सांगितले. मात्र, चॅनल 4 न्यूजने मेहदी शमी विटनेस नावाने ट्विटर अकाऊंट चालवत होता आणि रोज त्यावरून ट्विट्स करत असल्याचा दावा केला आहे.
हे वृत्त प्रसिद्ध होताच भारतीय प्रशासन व पोलिस यंत्रणेत खळबळ माजली असून चॅनल-4 नुसार जो युवक हे अकाउंट चालवत आहे तो एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीस आहे. बंगळुरू पोलिसांनी याची गंभीर दखल घेत जोरदार शोधमोहीम सुरू केली आहे. दरम्यान, हे टि्वटर अकाउंट शुक्रवारी बंद झाले असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

"शमी विटनेस' या टि्वटर अकाउंटचे 17 हजार 700 फॉलोअर्स होते, असे संबंधित वाहिनीने म्हटले आहे. महिन्याला सुमारे 20 लाख लोक या अकाउंटला भेट देत असल्याची माहितीही समोर येत आहे.
असे चालले आयएसचे अकाउंट
-गेल्या वर्षी सुरू झालेल्या अकाउंटद्वारे सिरियातील सैनिकांच्या हत्येचा व्हिडिओ अपलोड.
-आयएसच्या आक्रमकतेचा फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले होते. फ्रंटलाइनचे अपडेटही पोस्ट होते.
-ट्विटच्या साहाय्याने आयएसच्या दहशतवाद्यांचा उत्साह वाढवण्याचे काम. परस्पर माहितीची देवाणघेवाण
-अमेरिकी नागरिक पीटर कासिगचे शिर कत्तल केल्याचा फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केला होता.
वॉलवर माहिती
एक युवक मेहंदी या टोपणनावाने आयएसचे टि्वटर अकाउंट चालवत होता. तो एका जाहिरात कंपनीत नोकरीस आहे. जगभरात विविध दहशतवादी संघटना तसेच गटांशी संबंधित लोक हे अकाउंट फॉलो करत होते. या वॉलवर रोज आयएससंबंधी माहिती तसेच संघटनेचा उद्देश आणि जगभर संघटनेला मिळत असलेला प्रतिसाद याची माहिती प्रसिद्ध केली जात होती.
अकाउंट बंद, ब्लॉग सुरू
संबंधित युवक मोबाइलवरूनच हे अकाउंट चालवत होता. चॅनल-4 ने या युवकाशी संपर्क साधल्यानंतर त्याने ही माहिती दिली. मेहंदीचे टि्वटर अकाउंट बंद झाले आहे. परंतु त्याच्याशी संबंधित ब्लॉगपोस्ट अद्याप बंद झालेले नाहीत. त्याच्यावर गेल्या वर्षी जूनमध्ये शेवटचे पोस्ट झालेले दिसते. त्यात जिहादी गटांतील आपसातील चर्चा होती. आयएसच्या कारवाया सुरू करण्यासंबंधीचे काही संभाषण व्हिडिओत होते.
तपास सीबीआयकडे
बंगळुरू पोलिस आयुक्त एम.एन. रेड्डी म्हणाले, ब्रिटिश वाहिनीच्या दाव्याचा तपास करण्याची जबाबदारी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आली आहे. ही व्यक्ती बहुदा शहरातून बाहेर गेली असावा. सायबर सेल तिच्या मागावर असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसरीकडे ब्रिटिश वाहिनीने मेहंदीशी संपर्क साधला होता. संधी मिळाल्यास आपण सर्व गोष्टी सोडून आयएसच्या कारवायात सहभागी होऊ. तशी आपली तयारी आहे. सध्या कुटुंबाला माझी गरज आहे. त्यामुळे शहर सोडता येत नाही. माझे नाव जाहीर करू नका, अशी विनंती या तरुणाने ब्रिटिश वाहिनीला केली होती.