आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुतुबमीनारपेक्षा उंच आहे हा किल्ला, राजाच्या चितेवर बसून राणी गेली सती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपुरचा मेहरानगड किल्ला 120 मीटर उंच एक पर्वतावर निर्मित आहे. यामुळे हा किल्ला दिल्लीच्या कुतुबमिनारच्या उंची (73 मीटर)पेक्षा उंच आहे. किल्ल्याच्या परिसरात सती देवीचे एक मंदिर आहे. 1843 मध्ये महाराजा मानसिंह यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नीने चितेवर बसून जीवन यात्रा संपवली होती. हे मंदिर त्यांच्याच स्मृतीमध्ये उभारण्यात आले आहे.

किल्ल्याची भिंत 10 किलोमीटर लांब -
या किल्ल्याच्या भिंतीचा परीघ 10 किलोमीटर एवढा असून उंची 20 फुटपासून 120 फुटपर्यंत आहे. गोलाकार मार्गाने जोडलेल्या या किल्ल्याला चार दरवाजे आहेत. किल्ल्यामध्ये सात बुरुज आहेत. किल्ल्याच्या आत विविध भव्य महाल, नक्षीदार दरवळे आणि जाळीदार खिडक्या आहेत.

500 वर्षे जुना
जोधपुर शासक राव जोधा यांनी 12 मे 1459 मध्ये या किल्ल्याचे बांधकाम सुरु केले होते आणि महाराज जसवंत सिंह (1638-78) यांनी हे काम पूर्ण केले. या किल्ल्यामधील विविध महालातील विशेष महाल मोती महाल, फूल महाल, शीश महाल इ. आहेत. या महालांमध्ये राजघराण्यातील विविध वस्तू संग्रहित करून ठेवण्यात आल्या आहेत.

1965 च्या युद्धात देवीने केले होते या किल्ल्याचे रक्षण
राव जोधा यांची चामुंडा देवीवर अपार श्रद्धा होती. चामुंडा देवी जोधपुर शासकांची कुलदेवी आहे. राव जोधा यांनी 1460 मध्ये मेहरानगड किल्ल्याजवळ चामुंडा देवीचे मंदिर तयार करून त्यामध्ये मूर्ती स्थापना केली. 1965 मधील भारत-पाक युद्धामध्ये सर्वात पहिले जोधपुरवर हल्ला करण्यात आला होता. देवीच्या कृपेने या हल्ल्यामध्ये जोधपुरमधील एकही व्यक्तीला काहीही झाले नाही. या किल्ल्यावरील भीमकाय तोफांच्या मदतीने सहा किलोमीटरपर्यंतचा परिसर सुरक्षित ठेवला जात होता.

अद्भुत शिल्पकला
मेहरानगड किल्ल्यामध्ये लावलेले आकर्षक बलुआ दगड जोधपुरच्या कारीगारांची उत्तम शिल्पकला दर्शवतात. मेहरानगड किल्ल्यामध्ये सर्वात मोठा मोती महाल आहे. यामध्ये ‘श्रीनगर चैकी’ नावाचे जोधपुरचे सिंहासन आहे.

हॉलीवूड चित्रपटाची शुटींग
हॉलीवूड चित्रपट ’डार्क नाइट’मधील काही दृश्यांचे शुटींग मेहरानगड किल्ल्यामध्ये करण्यात आले आहे.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा या किल्ल्याचे सौंदर्य...