आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बकरीला वाघासोबत लढताना पाहून बांधला गेला होता हा किल्ला, कुतुबमिनारही यापूढे लहान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
10 किलोमीटर परिसरात पसरलेल्या मेहराणगडची उंची 20 फूट ते 120 फूट आहे. तर रुंदी 12 फूटांपासून 70 फुटापर्यंत आहे. - Divya Marathi
10 किलोमीटर परिसरात पसरलेल्या मेहराणगडची उंची 20 फूट ते 120 फूट आहे. तर रुंदी 12 फूटांपासून 70 फुटापर्यंत आहे.
जोधपूर (राजस्थान) - राजस्थान म्हणजे किल्ले आणि या किल्ल्यांचा रंजक इतिहास. जोधपूर आणि मेहरानगड किल्ल्याच्या स्थापनेचीही रंजक कथा आहे. जेव्हा राव जोधा यांच्या वडिलांचा मृत्यू झाला, त्यानंतर त्यांना मण्डोर राज्य सोडावे लागले. 15 वर्ष ते मेवाडच्या फौजांसोबत एकाकी झुंज देत होते. 1453 मध्ये मण्डोरवर त्यांचे अधिराज्य पुन्हा स्थापन झाले. त्यांना आपल्या राजधानीसाठी एका किल्ला उभारायचा होता. त्याच दरम्यान त्यांनी एका ठिकाणी बकरीला वाघासोबत लढताना पाहिले आणि त्यांनी निश्चय केला की येथेच आपला किल्ला उभा राहिल. जोधपूरचा मेहराणगड किल्ला 120 मीटर उंचीवरील डोंगरावर बांधण्यात आला होता. या किल्ल्याची उंची दिल्लीतील कुतुब मिनार (73 मीटर) पेक्षा जास्त आहे.

कधी काळी येथे होती वाघांची गुहा
- मण्डोरवर अधिराज्य मिळविल्यानंतर राव जोधा यांना जुना किल्ला मारवाडच्या राजधानीसाठी अयोग्य वाटायला लागला होता.
- तो किल्ला त्यांच्या पूर्वजांनी राव चूडा यांनी 1394 मध्ये जिंकला होता. राव जोधा यांनी त्यांच्या स्वतःच्या नावाने नगर आणि किल्ला उभारण्याची योजना तयार केली.
- राव जोधा यांनी जेव्हा राजस्थानच्या मसूरिया डोंगरावर किल्ला बांधण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांना तिथे काही अघटीत घडण्याची भीती सतावू लागली.
- या डोंगरावरील प्रसिद्ध लोकदेवता बालकनाथांच्या गुहेत जाऊन त्यांनी त्यांच्या शंकेचे निरसन करण्याचे ठरविले.
- गुरु बालकनाथ यांनी या डोंगराऐवजी दुसरीकडे किल्ला निर्माण करण्याचा सल्ला दिला.
- त्यांच्या सल्ल्यानंतर हे काम बंद करण्यात आले. राव जोधा किल्ल्याच्या जागेच्या शोधात पंचटेकडी भागात पोहोचले. येथील 'सिंघोडिया बाडी' येथे त्यांनी एक बकरी एका वाघासोबत मुकाबला करत असल्याचे पाहिले.
- हे दृष्य पाहाताच राव जोधा यांनी निर्णय घेतला की किल्ला येथेच बांधला जाईल. आजही हा परिसर सिंघोडिया बाडी नावाने प्रसिद्ध आहे. येथे वाघांच्या खूप गुहा होत्या म्हणून त्यांना सिंघोडिया बाडी म्हटले जात होते.

( ही संपूर्ण कथा पूर्वाश्रमीचे महाराज गजसिंह यांनी कथन केली आहे.)

500 वर्ष जुना आहे किल्ला
- जोधपूरचे महाराज राव जोधा यांनी 12 मे 1459 मध्ये या किल्ल्याची पायाभरणी केली आणि महाराज जसवंत सिंह (1638-78) यांनी तो पूर्ण केला.
- या किल्ल्यातील महालांमध्ये सर्वात महत्त्वाचा मोती महाल, फूल महाल, शीश महाल, सिलेह खाना, दौलत खाना आहेत.

10 किलोमीटर परिसरात आहे किल्ला
- मेहरानगड किल्ल्याचा परिसर 10 किलोमीटर पर्यंत पसरलेला आहे. याची उंची 20 फूट ते 120 फूट आहे. तर रुंदी 12 फूटांपासून 70 फुटापर्यंत आहे.
- लांबून एकच भव्य किल्ला दिसत असला तरी परकोट असलेल्या या किल्ल्यात सात किल्ले बांधण्यात आले आहेत. याच्या गोलाकार रस्त्यांवर चार दरवाजे आहेत.
- किल्ल्याच्या सौंदर्यात नक्षीकाम केलेले दरवाजे, शीश महाल, जाळीदार खिडक्या भर घालतात.

येथे झाले हॉलिवूड फिल्मचे शुटिंग
- हॉलिवूडमधील यशस्वी चित्रपट डार्क नाईटचे शुटिंग येथे झाले आहे.
- या चित्रपटाच्या शुटिंगनंतर महेरानगड हॉलिवूडसाठी एक बेस्ट डेस्टिनेशन झाले होते.

पुढील स्लाइडमध्ये पाहा,
> या किल्ल्यावरुन दिसतो पाकिस्तान
> विशाल किल्ल्याचे निवडक फोटो...
बातम्या आणखी आहेत...