आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Member Of Parliament Daughter Sells Mangoes In Ranchi

झारखंडमधील आम रस्त्यावर खासदार कन्या चक्क विकते आंबे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंद्रावती सारू - Divya Marathi
चंद्रावती सारू
रांची- झारखंडमधील आम रस्त्यावर आंबे विक्रेती ही महिला कुणी साधारण नाही. सलग आठ वेळा खासदार नंतर उपसभापती म्हणून कारकीर्द गाजवलेले करिया मुंडा यांची ही कन्या आहे. चंद्रावती सारू या शिक्षिका आहेत. आपल्या घरच्या बागेत यंदा फारच आंबे लागले म्हणून तिने थेट रस्त्याच्या बाजूलाच आंब्याचे छोटे दुकान थाटले. चंद्रावतीची साधी राहणी उच्च विचारसरणी रांचीमध्ये नेहमीच चर्चेत असते.

चंद्रावती यांची आंब्याची बाग आहे. यंदा आंब्याला चांगलाच बहर आला आहे. त्यामुळे त्यांनी थेट रस्त्याच्याकडे बसून आंबे विक्री करत आहेत. या आंबे विक्रीतून जे उत्पन्न मिळेल, ते गरजवंताना दिले जाईल, असे चंद्रावती यांनी म्हटले आहे. तसेच शेती व्यवसायाला दुय्यम स्थान देणार्‍यांना आपल्याकडून प्रेरणा मिळावी, अशी भावना चंद्रावती यांनी व्यक्त केली आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, चंद्रावती सारु यांचे फोटो...